New Marathi Movie : मुखवट्यांचा ‘बोहाडा’; प्राचीन परंपरेवर आधारलेल्या आगामी मराठी सिनेमाची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Marathi Movie) पृथ्वीतलावर माणूस हा एक असा प्राणी आहे जो एका जन्मात वेगवेगळे मुखवटे परिधान करून जगत असतो. वेगवेगळ्या लोकांसमोर, वेगवेगळ्या प्रसंगात माणूस वेगवेगळे मुखवटे धारण करून जगाला आणि कधी कधी स्वतःलाच फसवत असतो. मात्र, माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव अस्तित्वात आहे आणि तो म्हणजे निसर्ग. या निसर्गाचा गौरव, भारतीय पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून करायचा उत्सव म्हणजे ‘बोहाडा’. यावर आधारलेला एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘बोहाडा’ची घोषणा (New Marathi Movie)

नुकतीच आगामी चित्रपट ‘बोहाडा’ची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२५ सालामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. नुकतीच घोषणा केलेल्या या ‘बोहाडा’ चित्रपटाची निर्मिती दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन करणार आहेत. तर राहुल सतिश पाटील, कृतिका तुळसकर देवरूखकर हे सहनिर्मिती करणार आहेत.

(New Marathi Movie) तसेच विशाल सखाराम देवरुखकर हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. याशिवाय चित्रपटाचे लेखन अंबर विनोद हडप यांनी केले आहे. अद्याप या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार आहेत? याबाबत गोपनीयता राखण्यात आली आहे. मात्र लवकरच यावरून देखील पडदा उघड करण्यात येईल.

दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणले की, ‘निसर्गाची आपल्यावर जी कृपा आहे, त्याचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. खंत या गोष्टीची आहे की, आतापर्यंत हा उत्सव लोकांना माहित नव्हता. हा परंपरागत उत्सव आहे, त्यामुळे या रूढी, परंपरा या चित्रपटातून मांडण्याचा मी प्रयत्न केलाय.

(New Marathi Movie) या चित्रपटाच्या माध्यमातून हा उत्सव लोकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे. चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे निसर्गाशी संबंधित असल्याने यात मजा, सस्पेन्स, थ्रिलर यांचे मिश्रण असणार. त्यामुळे प्रेक्षकांना एक जबरदस्त अनुभव येणार आहे’.

५२ आठवडे, ५२ सोंगे

पुढे म्हणाले, ‘वर्षात ५२ आठवडे असतात, ५२ सोंगेही असतात, जे त्यांचे अस्तित्व दाखवत असतात. परंतु याचा थांगपत्ता आपल्याला नसतो. हेच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या विषयाचे नावीन्यही अफाट आहे, महाराष्ट्राच्या जंगलात लपलेल्या संस्कृतीवर आधारीत चित्रपट करण्याचा मोह दाक्षिणात्य निर्मात्यांनाही आवरला नाहीये. मराठी सिने दिग्दर्शक म्हणून मला अभिमान वाटतोय की, आपल्या विषयाला दाक्षिणात्य निर्माता पसंती दर्शवत आहेत’. (New Marathi Movie)