हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Night Trekking Places) आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक सुंदर तसेच निसर्गरम्य ठिकाणे आहेत जिथे गेल्यानंतर कितीही प्रयत्न केला तरी पाय निघत नाही. प्रत्येकालाच रोजच्या दगदगीतून थोडासा निवांत वेळ हवा असतो. अशा निवांतपणासाठी आपण लहान सहान पिकनिक प्लॅन करतो. पण निसर्गाच्या अद्भुत सौंदर्यात हरवून जाण्याची मजा काही वेगळीच मानसिक शांतता देते. अशा मानसिक शांततेसाठी आकाश दर्शनाइतका सुंदर इतर कोणताच पर्याय असू शकत नाही.
निरभ्र आकाश, लुकलुकणार्या चांदण्या, ढगांच्या मागे लपणारा चंद्र अशा कवी मनाचं आभाळ तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण अमावास्येच्या रात्री आकाशात अशा काही नैसर्गिक हालचाली होतात, ज्या पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. (Night Trekking Places) आपल्या महाराष्ट्रात अशी काही शांत आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत जिथे नैसर्गिक चमत्कारासह आकाश दर्शन करण्याचा आनंद घेता येतो. या ठिकाणांविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. जिथे आयुष्यात किमान एकदा तरी तुम्ही जरूर भेट द्या.
1. कळसूबाई शिखर
बऱ्याच नाईट ट्रेकर्ससाठी कळसूबाई शिखर प्रमुख आकर्षण आहे. (Night Trekking Places) कळसुबाई शिखरावरून आकाश दर्शन करण्याचा अनुभव काही वेगळाच आहे. खास मिल्कीवे पाहण्यासाठी इथे नाईट ट्रेकिंग केली जाते.
2. राजमाची (Night Trekking Places)
महाराष्ट्रात अशी काही ठिकाण आहेत जी नाईट ट्रेकसाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये लोणावळाजवळील राजमाचीचा समावेश आहे. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी निसर्गाचा अद्भूत चमत्कार पहायला मिळतो. त्यामुळे बरेच पर्यटक इथे रात्रीच्या वेळी आकाश दर्शनासाठी येत असतात.
3. हरिश्चंद्र गड
नाईट ट्रेकिंगसाठी आणखी एक बेस्ट स्पॉट म्हजे हरिश्चंद्र गड. (Night Trekking Places) या गडावरून दिसणारं आभाळ हे शहरात धूळ आणि प्रदूषणात हरवून गेलेल्या आभाळासारखं दिसत नाही. तर हरिचंद्रगडावरून होणारे आकाश दर्शन कायम डोळ्यात साठवून घ्यावे असे असते.
4. भंडारदरा
आकाश दर्शनासाठी भंडारदरा हेदेखील एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण मानले जाते. इथे खास आकाशगंगा आणि ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी नाईट ट्रेकचे आयोजन केले जाते. (Night Trekking Places) खास करून अमावस्येच्या रात्री इथे आवर्जून आकाशदर्शयासाठी पर्यटक येतात.