Nivati Beach Konkan : सिंधुदुर्गाची थायलंडला टक्कर!! पांढऱ्या वाळूचा ‘हा’ समुद्र किनारा स्वर्गाहुनी सुंदर; एकदा तरी भेट द्याच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Nivati Beach Konkan) कोकण म्हणजे स्वर्गसुख असे उगाच म्हणत नाहीत. उंच उंच माडाची झाडे, हिरवागार निसर्ग, निळेशार लांबच्या लांब पसरलेला समुद्रकिनारा, लाल माती, आंबा- काजू- सुपारीच्या बागा, कौलारू घर, शहाळ्याची मलई आणि रानमेवा. कोकणाला लाभलेला सुंदर समुद्र किनारा हा अनेक पर्यटकांचे केवळ लक्ष वेधून घेत नाही तर मन प्रफुल्लित देखील करतो. कोकण किनारा आणि त्याचे सौंदर्य अत्यंत नेत्रदीपक आहे. यातील एक समुद्रकिनारा असा आहे जो थायलंडच्या सौंदर्याला तोडीस तोड आहे. या समुद्रकिनाऱ्याविषयी आपण जाणून घेऊया.

सिंधुदुर्गमध्ये थायलंडचा फील (Nivati Beach Konkan)

कोकणात सिंधुदुर्गमध्ये निवतीचा समुद्र किनारा आहे. जो कुडाळपासून साधारण २५ किलोमीटर अंतरावर आहे. दूरवर पसरलेला अत्यंत सुंदर आणि लक्षवेधी असा हा समुद्रकिनारा महाराष्ट्रात असूनही अगदी थायलंडचा फील देतो. अनेक लोकांच्या बँकेत लिस्टमध्ये थायलंड असेल. पण वेळेअभावी किंवा अन्य कारणांमुळे जाता येत नसेल तर एकदा निवतीच्या समुद्र किनाऱ्याला नक्की भेट द्या.

अदभूत नेत्रदीपक सौंदर्य

निवतीच्या समुद्रकिनाऱ्याची खासियत म्हणजे हे निसर्गाचे एक अद्भुत दृश्य आहे. (Nivati Beach Konkan) जे डोळ्यात साठवून आनंद घ्यावा असे कुणालाही वाटू शकते. इथे भेट दिल्यानंतर आपोआप ताण तणाव कुठच्या कुठे निघून जातो ते कळतही नाही. समुद्र किनाऱ्यावर नारळी- पोफळी आणि सुपारीची उंच झाडं आहेत. तसेच या ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याची एक वेगळीच मजा आहे.

पांढऱ्या रेतीचा समुद्रकिनारा

थायलंडमध्ये जशी पांढरी रेती पहायला मिळते अगदी तशीच निवतीच्या समुद्र किनारी पहायला मिळते. या रेतीमुळे सुमद्राचा तळ अगदी सहज दिसतो. सुंदर, फेसाळलेला, निळाशार आणि स्वच्छ समुद्र आपल्या सौंदर्याची जणू भुरळ पाडतो. सुंदर समुद्रकिनारा आणि खाडीच्या अनोख्या संगमातून तयार झालेले हे निस्सीम सौंदर्य लाभलेला निवती समुद्र किनारा हा कोकण सिंधुदुर्ग मधील अनोखा समुद्र किनारा आहे. (Nivati Beach Konkan)