Noise Pollution : वाहनांच्या आवाजामुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; तज्ञांनी केला धक्कादायक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Noise Pollution) गेल्या काही काळात प्रदुषण ही जागतिक समस्या होऊन बसली आहे. दिवसेंदिवस ही समस्या डोईजड होऊ लागली आहे. खास करून ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस हातपाय पसरू लागलं आहे. ध्वनी प्रदूषण देखील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचे मुख्य कारण आहे. केवळ पर्यावरणाला नव्हे तर मानवी आरोग्याला देखील ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे. आजकाल वाहतुकीसाठी प्रत्येकाकडे स्वतःची गाडी आहे. त्यामुळे वाहनांची संख्या फार वाढली आहे. दरम्यान काही तज्ञांनी केलेल्या संशोधनात असे उघड झाले आहे की, गाड्यांच्या आवाजामुळे हृदयविकार, मधुमेह आणि स्ट्रोकसारख्या समस्यांचा धोका वाढत आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया.

संशोधनात धक्कादायक खुलासा (Noise Pollution)

एका आंतरराष्ट्रीय संघातील संशोधकांनी विविध रोगांचे कारण ठरणाऱ्या महामारीविषयक डेटाचे बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण केले. दरम्यान त्यांनी केलेल्या अभ्यासात त्यांच्या लक्षात आले की, गाड्यांचा आवाज हा ध्वनी प्रदूषणाच्या वाढीचे कारण आहे. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह यांसारख्या आजरांचा धोका वाढत आहे. (Noise Pollution) या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षात असे समोर आले आहे की, आजकाल प्रत्येकाकडे गाडी आहे. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांच्या आवाजाचा प्रत्येक १० डेसिबल वाढीमागे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी ३.२% इतका रोगांचा धोका वाढत आहे.

विशेष करून रात्रीच्या वेळी गाड्यांच्या आवाजाचा हानिकारक प्रभाव, अपुरी झोप, रक्त वाहिन्यांमधील ताण तणाव वाढणे, जळजळ आणि रक्त वाहिन्यासंबंधीत आजार वाढू शकतात. (Noise Pollution) याबाबत बोलताना प्रमुख तज्ञांनी म्हटले आहे की, ‘आमच्यासाठी हे देखील महत्त्वाचे आहे की सबळ पुराव्यांमुळे ट्रॅफिकचा आवाज अखेरीस हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगासाठी जोखीम घटक म्हणून ओळखला जातो’.

तोडगा काय?

रात्रीच्या वेळी गाड्यांचा आवाज अधिक प्रभावीपणे आणि हानिकारक स्वरूपात मानवी आरोग्यावर परिणाम करत आहे. त्यामुळे दाट लोकवस्तीच्या भागात गजबजलेल्या रस्त्यांवर ध्वनी कमी करणाऱ्या यंत्रणा बसवणे गरजेचे आहे. शिवाय गाड्यांचा आवाज १० डेसिबलपर्यंत असायला हवा. शिवाय रस्ते बांधणीत आवाज कमी करणारे डामर वापरावे. (Noise Pollution) वाहनांची वेग मर्यादा आणि कमी आवाजाच्या टायर्सचा प्रचार करावा. वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाने शहरी रस्त्यावरील ट्राफिकचा आवाज कमी करण्यासाठी सायकल आणि सार्वजनिक वाहतूक यासारख्या वाहतुकीचा वापर करावा.