आता मॅसेज पाठण्यासाठी मोबाइल नंबर सेव्हची गरज नाही ; जाणून घ्या ‘ही’ पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्हाट्सअँप या प्लॅटफॉर्मचा वापर कोट्यवधी लोक करत आहेत . वापरकर्त्यांना अधिक आनंद देण्यासाठी व्हाट्सअँप नेहमी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. ज्याबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना नसते . व्हाट्सअँपवर मॅसेज करायचं म्हंटल कि , आधी नंबर सेव्ह करावा लागतो . त्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मॅसेज करू शकता . पण जर नंबर सेव्ह न करता तुम्हाला मॅसेज करता येईल हे ऐकायला आणि वाचायला किती छान वाटतंय ना . तर हे प्रत्येक्षात सुद्धा करता येईल . तर चला त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

WA.me चा वापर

व्हाट्सअँपवर नंबर सेव्ह न करता मॅसेज पाठवण्यासाठी तुम्ही WA.me या लिंकचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला (https://wa.me/phonenumber) URL चा वापर करायचा आहे आणि फोन नंबरच्या जागी देशाचा कोड तसेच मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर लिंक क्रोममध्ये सर्च करा आणि चॅटवर क्लिक करा . त्यानंतर त्या नंबरसाठी चॅट बाँक्स ओपन होईल आणि तुम्ही मॅसेज करू शकता.

ट्रूकॉलर ॲपचा वापर

ट्रूकॉलर ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मॅसेज करू शकता . यासाठी तुम्हाला नंबर सेव्ह करावा लागणार नाही . यासाठी तुम्हाला ट्रूकॉलर ॲप डाउनलोड करावी लागेल . नंतर त्यावर त्या व्यक्तीचा नंबर शोधावा लागेल . ज्याला तुम्हाला मॅसेज पाठवायचा आहे , त्या प्रोफाइलवर क्लिक करा आणि व्हाट्सअँप आयकॉनवर क्लिक करा . या नंतर तुम्ही सुलभपणे मॅसेज पाठवू शकता .

व्हाट्सअँप ग्रुपचा वापर

तुम्ही ऍड असलेल्या ग्रुपमध्ये एखादी व्यक्ती ऍड असल्यास त्या व्यक्तीला मॅसेज करू शकता , यासाठी नंबर सेव्ह करण्याची गरज भासणार नाही . हि पद्धत सर्वात सोपी आहे . हि पद्धत वापरण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ग्रुप चॅट ओपन करावा लागेल . नंतर पार्टिसिपेंट्सवर क्लिक करावे आणि व्यक्तीचा नंबर शोधून तुम्हाला मॅसेज करता येईल.

न्यू चॅटचा वापर

तुम्ही स्वतःला मॅसेज करून देखील नंबर सेव्ह न करता मॅसेज पाठवू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम न्यू चॅटवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मॅसेज युअर सेल्फ हा पर्याय निवडायचा आहे. स्वतःला तो नंबर सेंड करून त्या नंबरवर क्लिक करा . या प्रोसिजर नंतर चॅट विथ धिस नंबर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे काम सोपे होईल . या पद्धती वापरून तुम्ही नंबर सेव्ह न करता सहजपणे एखाद्या व्यक्तीला मॅसेज करू शकता .