हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांसाठी एक मोठा बदल होण्याच्या तयारीत आहे. मेटा (Meta), फेसबुक (Facebook ) अन इन्स्टाग्रामच्या (Instagram) मालकीची कंपनी, युजर्सकडून सोशल मीडिया वापरण्यासाठी शुल्क आकारण्याच्या निर्णयावर विचार करत आहे. त्यामुळे येत्या काळात, युरोपियन युनियनमधील फेसबुक अन इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी महिन्याला $14 (प्रत्येक 1,190 रुपये) पर्यंत शुल्क आकारण्याची योजना आहे. या निर्णयामुळे लोकांची चिंता वाढली आहे. तर चला या नव्या धोरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
शुल्क लागू होणार –
मेटाच्या या निर्णयामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. युजर्ससाठी एक जाहिरातमुक्त (Ad-free) अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशाने मेटा हा निर्णय घेत असल्याचे समजते. पण , जाहिरातींसह सर्फिंगचा अनुभव घेणाऱ्यांसाठी हा शुल्क लागू होणार नाही. मेटा अधिकृतपणे सांगत आहे की, कंपनी एक ‘कॉम्बो ऑफर’ देखील लाँच करणार आहे, ज्यामध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे Ad-free वर्जन $17 (आंदाजे 1,430 रुपये) दराने उपलब्ध होईल. मात्र, ही सुविधा फक्त डेस्कटॉप युजर्ससाठी लागू होईल.
डिजिटल टेक कंपन्यांवर कडक नियम लागू –
युरोपियन युनियनने डिजिटल टेक कंपन्यांवर कडक नियम लागू केले आहेत, ज्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या युजर्सच्या ब्राऊझिंग हिस्ट्रीच्या आधारावर टार्गेटेड जाहिराती दाखविण्याचे धोरण बदलावे लागणार आहे. युरोपियन युनियनने यापूर्वी ही कंपन्यांना ब्राउझिंगवर आधारित जाहिराती बंद करण्याचे निर्देश दिले होते.
एक सब्स्क्रिप्शन मॉडेल सुरू –
युरोपियन युनियनने लागू केलेल्या नवीन नियमांच्या अंतर्गत, सोशल मीडिया कंपन्यांना जाहिरातींविना अनुभव देण्यासाठी एक सब्स्क्रिप्शन मॉडेल सुरू करणे आवश्यक होईल. याचा अर्थ, युजर्सला Ad-free अनुभवासाठी एक ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. हे मॉडेल पुढील काळात कसे सुरु होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मेटाने आपल्या भूमिकेवर स्पष्टता आणताना सांगितले की, युजर्सच्या परवानगीशिवाय पर्सनलाइज्ड जाहिराती दाखविली जाणार नाहीत. युरोपियन युनियनने सोशल मीडिया कंपन्यांना नियमांचे पालन न केल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या निर्णयाने सोशल मीडिया वापराच्या अनुभवावर कसा परिणाम होईल आणि युजर्सचे विचार काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.