Nubia V70 Design स्मार्टफोन लाँच ; दमदार फीचर्ससह कमी बजेटमध्ये उपलब्ध

nubia
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ZTE च्या सबसिडियरी कंपनीने V सीरिजमधील नवीन स्मार्टफोन Nubia V70 Design लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना 28 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार असून, या फोनमध्ये 6.7 इंचाची LCD स्क्रीन आणि Apple च्या डायनॅमिक आयलंड फीचरप्रमाणे Live Island 2.0 फीचर आहे. हा फोन 4GB रॅम आणि 256GB स्टोरेजसोबत उपलब्ध आहे. तसेच यात 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित MyOS 14 वर चालतो. त्यामुळे अनेक ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.

Nubia V70 Design फीचर्स –

Nubia V70 Design ड्युअल सिम सपोर्टसह येतो आणि Android 14 बेस्ड MyOS 14 वर चालतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेली 6.7 इंच IPS LCD स्क्रीन आहे. फोनमध्ये 12nm ऑक्टाकोर Unisoc T606 प्रोसेसरसह 4GB रॅमचा समावेश आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा प्रमुख कॅमेरा असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपचा समावेश आहे. पण इतर कॅमेऱ्यांची माहिती अजून दिलेली नाही. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 256GB स्टोरेज, 4G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, आणि USB Type-C पोर्ट यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत. 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्टसह हा फोन नोटिफिकेशन्ससाठी Live Island 2.0 फीचर देखील प्रदान करतो.

फोनची किंमत आणि रंग –

याआधी चीनमध्ये Nubia Z70 Ultra लाँच करण्यात आला होता. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर, 6150mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग, 6.85-इंच AMOLED डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Nubia V70 Design ची किंमत PHP 5299 सुमारे 7600 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन फिलीपिन्समध्ये प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि 28 नोव्हेंबरपासून Lazada, Shopee आणि अन्य रिटेल चॅनेल्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच हा फोन ग्राहकांना नारंगी , हिरवा , करड्या , गुलाबी या आकर्षित रंगामध्ये उपलब्ध आहे.