हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला आपल्याजवळ एक स्वतःची कार असावी असे वाटत असते. पण पैशा अभावी महागडी गाडी घेणे शक्य होत नाहीत. पण आता ग्राहकांचे बजेटमध्ये कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आता मार्च महिन्यात मारुती सुझुकीने आपल्या कार मॉडेल्सवर आकर्षक डिस्काउंट्स आणि बोनस ऑफर जाहीर केला आहे. त्यामुळे दमदार फीचर्सवाल्या गाड्या ग्राहकांना कमी किंमतीत मिळणार आहेत. त्यात स्विफ्ट, वॅगन आर, अल्टो के10 आणि एस-प्रेसो या सारख्या कारचा समावेश असणार आहे. तर या गाड्यांवर कंपनीने किती सूट दिली आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मारुती स्विफ्ट –
नवीन स्विफ्टमध्ये 9-इंचाची टचस्क्रीन, 6स्पीकर ऑडिओ सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस फोन चार्जिंग, क्रूझ कंट्रोल आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसारखे आधुनिक फीचर्स आहेत. तसेच यामध्ये 6 एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देखील पाहण्यास मिळतात. त्यामुळे तुम्हाला स्विफ्टच्या पेट्रोल मॅन्युअल आणि सीएनजी व्हेरिएंटवर 65,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
मारुती अल्टो के10 –
अल्टो के10 मध्ये 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, डिजीटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि पॉवर एडजस्टेबल ओआरव्हीएमसारखी फीचर्स आहेत. तसेच, आता सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज उपलब्ध आहेत. अल्टो के10 च्या पेट्रोल-मॅन्युअल आणि सीएनजी व्हेरिएंटवर 80,000 रुपयांपर्यंत ग्राहकांना सूट मिळणार आहे.
मारुती एस-प्रेसो –
कारमध्ये 7 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, फ्रंट पॉवर विंडोज आणि कीलेस एंट्री सारखी सुविधायुक्त फीचर्स आहेत. एएमटी व्हेरिएंटमध्ये स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) आणि हिल होल्ड असिस्ट सारखी सुरक्षितता फीचर्स उपलब्ध आहेत. एस-प्रेसो एएमटी व्हेरिएंटवर 85,000 रुपयांपर्यंत सूट आणि पेट्रोल-मॅन्युअल व सीएनजी व्हेरिएंटवर 80,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
मारुती वॅगन आर –
7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, 4-स्पीकर म्युझिक सिस्टम, स्टीअरिंग माउंटेड ऑडिओ आणि फोन कंट्रोल्स आणि 14-इंच अलॉय व्हील्स यासारखी प्रमुख फीचर्स वॅगन आरमध्ये आहेत. वॅगन आरवरील डिस्काउंट 10,000 रुपयांनी वाढवून आता 80,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच, सर्व वॅगन आर सीएनजी व्हेरिएंटमध्ये 75,000 रुपयांपर्यंत फायदे उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त लाभ मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी हा डिस्काउंट्स आणि बोनस ऑफर सुवर्णसंधी ठरणार आहे. या कार मॉडेल्सवर मार्च महिन्यात फायदा मिळवण्याची संधी सोडू नका.