OLA Electric Scooter: सिंगल चार्जमध्ये 320 KM प्रवास; Ola ची परवडणारी इलेक्ट्रिक स्कुटर

0
1
OLA Electric Scooter
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । OLA Electric Scooter – देशातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी वाहन उत्पादक कंपनी OLA ने आपली थर्ड जनरेशन स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरच्या चार विविध व्हेरिएंट्सची किंमत 79,999 रुपये पासून सुरू होते. त्यातच, कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये S1 Pro Plus मॉडेल देखील लाँच केले आहे, जे देशातील सर्वात जास्त ड्रायव्हिंग रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर ठरली आहे. तर चला या गाडीबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

स्कूटरच्या लाँचची घोषणा (OLA Electric Scooter)-

OLA च्या फाऊंडर आणि सीईओ, भाविश अग्रवाल यांनी या नव्या स्कूटरच्या लाँचची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या थर्ड जनरेशन स्कूटरमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ती अन्य मॉडेल्सपेक्षा अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम ठरली आहे. OLA कंपनीने दावा केला आहे की, मार्केटमध्ये 25 % वाटा आहे आणि त्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये नंबर वन स्थान मिळवले आहे.

नव्या प्लॅटफॉर्मवर डिझाइन –

OLA च्या नवीन स्कूटरमध्ये (OLA Electric Scooter)अनेक नवे आणि सुधारित तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने सांगितले की, नव्या थर्ड जनरेशन मॉडेलला पूर्णपणे नव्या प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आले आहे. त्यात हबलेस मोटर ऐवजी मिड ड्राईव्ह इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. यामुळे, स्कूटरची ड्रायव्हिंग रेंज सुधारली आहे. याशिवाय, चेन ड्राईव्ह सिस्टमचा वापर केला आहे, ज्यामुळे स्कूटरच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा होईल. या स्कूटरमध्ये पेटेंटेड ब्रेक बाय वायर टेक्नोलॉजी वापरली आहे, ज्यामुळे ब्रेक्स आणि माइलेजवर सकारात्मक परिणाम होतो.

OLA S1 X –

तीन बॅटरी पॅक व्हेरिएंट्स ( 79,999 रुपये, 89,999 रुपये, 99,999 रुपये)
7KW पीक पॉवर
टॉप स्पीड – 123 किमी/तास
ड्रायव्हिंग रेंज – 242 किमी (सिंगल चार्ज)

OLA S1 X+ –

4kWh बॅटरी पॅक
11kW पीक पॉवर
टॉप स्पीड – 125 किमी/तास
ड्रायव्हिंग रेंज – 242 किमी

OLA S1 Pro –

4kWh बॅटरी पॅक
11kW पीक पॉवर
टॉप स्पीड – 0-40 किमी/तास – 2.7 सेकंद
ड्रायव्हिंग रेंज – 242 किमी

OLA S1 Pro Plus – (OLA Electric Scooter)

4kWh आणि 5kWh बॅटरी पॅक
टॉप स्पीड- 141 किमी/तास
ड्रायव्हिंग रेंज- 320 किमी (सिंगल चार्ज)
ड्यूल चॅनेल एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह अनेक एडवांस फीचर्स
OLA च्या या नवीन स्कूटरने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे, आणि त्याची आवड निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज

‘या’ महिन्यात खुलणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ; ऑक्टोबरपासून दररोज 150 उड्डाणे