Ola Roadster X: 9.1 kWh बॅटरी , 501km रेंजसह Ola Roadster X इलेक्ट्रिक बाईक लाँच

0
1
Ola Roadster X
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ola Roadster X – ओला (Ola) ने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल Ola Roadster X लाँच केली आहे. या मोटरसायकलची किंमत १५ ऑगस्ट २०२४ रोजी लाँच करण्यात आलेली होती, आणि त्याच्या वेरिएंट्सची माहितीही दिली गेली होती. हा इलेक्ट्रिक रोडस्टर दोन वेरिएंट्समध्ये उपलब्ध असून, त्यात Roadster X आणि Roadster X+ चा समावेश होतो. ओला रोडस्टर एक्स आणि रोडस्टर एक्स+ भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे भारतीय बाजारात इलेक्ट्रिक बाईकचा आणखी विस्तार होईल. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Ola Roadster X च्या फीचर्स –

ओला रोडस्टर X मध्ये चेन ड्राईवसह अधिक शक्तिशाली मिड-माउंटेड मोटर दिली आहे. यामध्ये फ्रंट सस्पेन्शन आरएसयू टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रियर सस्पेन्शन ट्विन शॉक एब्जॉर्बर दिले आहेत. याचे प्रमुख फीचर्स म्हणजे सिंगल-पीस सीट, सिंगल-पीस ग्रैबरेल, अलॉय व्हिल्स, गार्ड, फ्रंट डिस्क ब्रेक, सिंगल-चॅनेल एबीएस, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड, ब्रेक-बाय-वायर आणि इंडस्ट्री-फर्स्ट फ्लॅट केबल असे दमदार फीचर्स दिले आहेत.

बॅटरी आणि रेंज –

2.5kWh – 7kW मोटर, टॉप स्पीड 105kmph, रेंज 117km. 350W चार्जरसह 6.2 तासांत 0-80% चार्ज होईल.
3.5kWh – 7kW मोटर, टॉप स्पीड 117kmph, रेंज 159km. 750W चार्जरसह 4.6 तासांत 0-80% चार्ज होईल.
4.5kWh – 7kW मोटर, टॉप स्पीड 124kmph, रेंज 200km. 750W चार्जरसह 5.9 तासांत 0-80% चार्ज होईल.

Ola Roadster X+

4.5kWh – 11kW मोटर, टॉप स्पीड 125kmph, रेंज 252km. 750W चार्जरसह 5.9 तासांत 0-80% चार्ज होईल.
9.1kWh – 11kW मोटर, टॉप स्पीड 125kmph, रेंज 501km. 1000W चार्जरसह 8 तासांत 0-80% चार्ज होईल.

Ola Roadster X च्या किंमती –

2.5kWh: 74,999 रुपये (इंट्रोडक्टरी किंमत) आणि 11 फेब्रुवारीनंतर 89,999 रुपये.
3.5kWh: 84,999 रुपये (इंट्रोडक्टरी किंमत) आणि 11 फेब्रुवारीनंतर 99,999 रुपये.
4.5kWh: 94,999 रुपये (इंट्रोडक्टरी किंमत) आणि 11 फेब्रुवारीनंतर 1,09,999 रुपये.

Ola Roadster X+ च्या किंमती –

4.5kWh: 1,04,999 रुपये (इंट्रोडक्टरी किंमत) आणि 11 फेब्रुवारीनंतर 1,19,999 रुपये.
9.1kWh: 1,54,999 रुपये (इंट्रोडक्टरी किंमत) आणि 11 फेब्रुवारीनंतर 1,69,999 रुपये.

ओला रोडस्टर X आणि X+ वेरिएंट्सच्या लाँचसह, ओला इलेक्ट्रिक मोटरसायकल्सच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.