पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना इलेक्ट्रिक स्कूटरला लोकांची चांगली पसंती मिळत आहे. वाहन कंपन्या सुद्धा नवनवीन गाड्या इलेक्ट्रिक वर्जन मध्ये आणत आहेत. मग यामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर या दोन्ही गाड्यांचा समावेश आहे. त्यातही टू व्हीलर ला ग्राहकांची अधिक पसंती मिळत असल्याचा दिसत आहे. आता जर तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेईकल विकत घ्यायचं असेल तर सर्वात आधी बजेटचा प्रश्न पुढे येतो पण स्वस्तात इलेकट्रीक स्कुटर खरेदीचा पर्याय कोणता ? याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. देशातील सर्वात स्वस्त आणि जास्त लांब रेंज देणारी स्कुटर असा कम्पनीचा दावा असलेल्या OLA s1x याबद्दल आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
आता लोक रोजच्या कामासाठी इलेक्ट्रिक स्कूटर वापरत आहेत. दरम्यान, ओला इलेक्ट्रिकला अल्पावधीतच भारतीय बाजारपेठेत लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तुम्ही फक्त 20 हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटसह Ola S1X खरेदी करू शकता.
Ola S1X स्वस्तात घ्यायची आहे ?
ओला इलेक्ट्रिकने ओला Ola S1X इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. लॉन्च झाल्यापासून या स्कूटरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 75 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. त्याच वेळी, ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 95 ते 195 किमीची अंतर कापते.
या इलेक्ट्रिक स्कूटरच्या 2 kW वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 74,999 रुपये आहे. तर याची ऑन रोड किंमत ७९ हजार रुपये आहे.आता या स्कूटरवर 20 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला बँकेकडून सुमारे 59 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. हे कर्ज 3 वर्षांसाठी दिले जाईल, त्यानंतर तुम्ही 3 वर्षांसाठी बँकेला EMI म्हणून दरमहा सुमारे 1876 रुपये द्याल.
8 वर्षांची वॉरंटी
याशिवाय बँक तुम्हाला या कर्जावर 9 टक्के व्याज देखील आकारेल. 2 kWh बॅटरीसह, ही इलेक्ट्रिक स्कूटर एका पूर्ण चार्जवर सुमारे 95 किमी जाते . या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 85 किमी आहे. तसेच त्याचे वजन फक्त 101 किलो आहे. इतकंच नाही तर त्यात बसवलेल्या बॅटरीवर कंपनी ग्राहकांना 8 वर्षांची वॉरंटीही देते.
Ola S1X 3kWh
आता या इलेक्ट्रिक स्कूटरच्या 3 kWh बॅटरी व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, ही स्कूटर एका पूर्ण चार्जवर सुमारे 143 किमीची रेंज देते. तसेच, कंपनीने ताशी 90 किमीचा टॉप स्पीड दिला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची ऑन रोड किंमत सुमारे 89 हजार रुपये आहे. आता तुम्ही 20 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट करून खरेदी केल्यास तुम्हाला बँकेकडून 3 वर्षांसाठी 69 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. या रकमेवर बँक तुमच्याकडून 9 टक्के व्याज देखील आकारेल. यानंतर तुम्ही या स्कूटरसाठी 3 वर्षांसाठी 2194 रुपये EMI द्याल. आणि स्वस्तात OLA स्कुटर तुमची होईल.