धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई, पुण्यासह विविध स्थानकांमधून नागपूरसाठी धावणार विशेष गाड्या

0
1
nagpur special train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

येत्या 14 ऑक्टोबर दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. त्यामुळे अख्या देशभरातून लोक यानिमित्ताने नागपूरला जातात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक खुशखबर आहे. या प्रवाशांसाठी आता रेल्वे कडून खास सोय करण्यात आलेली आहे. मुंबई आणि पुणेसह विविध स्थानकातून यासाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती…

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्धांसाठी महत्त्वाचा आणि प्रमुख दिवस आहे. या दिवशी बौद्ध बांधव नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देतात आणि तिथे जाऊन प्रार्थना करतात. याबरोबरच हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यामुळे नागपूर मध्ये अनेक लोक जातात. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे कडून विशेष गाड्यांचा नियोजन करण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस नागपूर

यात गाडी क्रमांक 01017 लोकमान्य टिळक टर्मिनस नागपूर ही अनारक्षित विशेष गाडी मुंबई येथून दि. 13 रात्री 2 वाजता सुटेल. तर 01018 नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 13 ऑक्टोंबर रोजी नागपूर येथून रात्री 00.20 मिनीटांनी सुटेल.

थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंदी आणि अजनी येथे थांबे असणार आहे.

नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष‌ गाडी

ट्रेन क्रमांक 01218 नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष‌ गाडी 12 ऑक्टोंबर रोजी रात्री 10 वाजून 25 मिनीटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी एलटीटी मुंबई येथे 2 वाजून 35 मिनीटांनी पोहोचल. तर ट्रेन क्रमांक 01215 नागपूर-पुणे अनारक्षित विशेष ही गाडी नागपूर येथून रात्री 11 वाजता सुटेल तर पुणे येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

थांबे : सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबा देण्यात आला आहे.

पुणे-नागपूर अतिजलद विशेष ट्रेन

ट्रेन क्रमांक 01216 पुणे-नागपूर अतिजलद विशेष ट्रेन 11 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

थांबे : अजनी, सिंदी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा येथे थांबा घेणार आहे. या सोबतच मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइनवर थांबे राहतील.

भुसावळ-नागपूर- नाशिक रोड

तर 01213 भुसावळ-नागपूर- नाशिक रोड ही मेमू विशेष ट्रेन 12 ऑक्टोंबर रोजी भुसावळ येथून पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 12 वाजता पोहोचेल. तर 01214 ही मेमू विशेष 12 ऑक्टोंबर रोजी नागपूर येथून रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि नाशिकरोड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल. गाड्यांचे थांबे, वेळापत्रकासाठी भारती. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.