भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगन्य कंपन्यांपैकी एक असलेली कंपनी म्हणजे रिलायन्स जिओ. परवडणाऱ्या दरात मोबाईल, परवडणाऱ्या दरात रिचार्ज देऊन सुरुवातीला जिओ ने अक्षरशः बाजार व्यापून टाकला होता. आता देखील जिओ कडून वेगवेगळ्या प्लान्स आपल्या ग्राहकांसाठी देण्यात येतात आज आपण अशाच एका प्लॅन बद्दल माहिती करून घेणार आहोत. सध्याचा विचार करता जिओचे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे यूजर त्याच्या गरजेनुसार प्लॅन निवडू शकतात. आजच्या लेखात आपण अशाच एका खास प्लॅन बद्दल जाणून घेणार आहोत.
जिओचा फॅमिली प्लॅन
होय आज आम्ही तुम्हाला जिओच्या फॅमिली प्लॅन बद्दल सांगणार आहोत. एक असा प्लान ज्यामध्ये प्लान एक आणि त्यामध्ये जास्तीत जास्त चार सिम कार्ड चालवले जाऊ शकतात.
काय आहे किंमत?
जिओच्या या फॅमिली प्लॅनची किंमत आहे 449 रुपये. हा प्लॅन एक पोस्टपेड प्लॅन आहे आणि या प्लॅनमध्ये युजर्स ना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा याशिवाय आणखीन सुविधा मिळतात.
जिओच्या या प्लॅनमध्ये 75 जीबी डेटा एक्सेस करण्यासाठी मिळतो आणि एक सीम ऑन केल्यानंतर ५ जीबी डेटा एक्स्ट्रा ऍड होतो. जिओचा हा रिचार्ज केल्यानंतर यूजर ना अनलिमिटेड कॉलिंग चा फायदा तर मिळतोच याशिवाय यामध्ये STD आणि लोकल कॉल्सचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.
तुम्ही या प्लानचा वापर करत असताना युजर माय जिओ ॲप मध्ये जाऊन प्लानला मॅनेज करू शकतो याशिवाय यामध्ये डेटा सुद्धा ऍड करू शकतो. फॅमिली प्लॅन मध्ये एक सिम ऍड ऑन केल्यानंतर 150 रुपये प्रति सीम एक्स्ट्रा ऍड केले जातात आणि त्याच्यानंतर GST सुद्धा ऍड केला जातो.