OnePlus 12R: फक्त 18,000 रुपयांत मिळतोय OnePlus 12R; पहा कुठे आहे ऑफर

0
3
OnePlus 12R
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । OnePlus 12R – तुम्ही उत्तम फीचर्स आणि आकर्षक किंमतीसह मिड-रेंज स्मार्टफोन शोधत असाल, तर OnePlus 12R तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोनवर अमेझॉनवर मोठा डिस्काउंट आणि एक्सचेंज डील उपलब्ध आहे, ज्यामुळे त्याची किंमत अतिशय परवडणारी झाली आहे. OnePlus 12R स्मार्टफोन 42,999 रुपये किमतीचा होता, पण आता त्यावर 23% सूट देण्यात आलेली आहे, आणि त्याची नवीन किंमत 32,999 रुपये झाली आहे. यासोबत , विशेष बैंक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरद्वारे ग्राहकांना हा फोन 18,000 रु मिळू शकतो . त्यामुळे ग्राहकांना खूप मोठी बचत करण्याची संधी मिळत आहे.

OnePlus 12R फक्त 18,000 रुपयांमध्ये –

OnePlus 12R स्मार्टफोनवर खास एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात अधिक बचत करू शकता. Amazon वर एक्सचेंज ऑफर अंतर्गत, तुम्हाला 22,800 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते, याचा अर्थ तुम्हाला एकाच स्मार्टफोनवर कमी किंमतीत डील मिळू शकते. समजा जर तुमच्या जुन्या स्मार्टफोनची एक्सचेंज किंमत 12,000 रुपये असेल, तर तुम्ही OnePlus 12R फक्त 18,000 रुपयांमध्ये मिळवू शकता.

फीचर्स –

OnePlus 12R स्मार्टफोन त्याच्या दमदार हार्डवेअर आणि आकर्षक डिस्प्लेसाठी ओळखला जातो. त्यामध्ये 6.78 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले असून 120Hz LTPO 4 तंत्रज्ञान, तसेच HDR10+ सपोर्ट देखील आहे. याशिवाय, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 5,500mAh बॅटरी आणि 100W SUPERVOOC फास्ट चार्जिंगची सुविधा दिली आहे. रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये 8GB आणि 16GB रॅम तसेच 128GB आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. कॅमेरा सिस्टिममध्ये 50MP Sony IMX89 प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेराची क्षमता 16MP असून, उच्च दर्जाचे सेल्फी घेता येतात. स्मार्टफोनमध्ये OxygenOS 14 ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी Android 14 आधारित आहे. कनेक्टिव्हिटीसाठी USB Type-C, Dolby Atmos सपोर्ट अशा महत्त्वाच्या सुविधा देखील दिल्या आहेत.

अमेझॉनवर खास डील –

जर तुम्ही ताबडतोब स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल, तर अमेझॉनवर हि खास डील जरूर तपासा. OnePlus 12R तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये सर्वोत्तम अनुभव देईल.