Online Railway Ticket : रेल्वेने केली ‘ही’ महत्वाची अट रद्द ; मिळणार विशेष बोनसही

Indian Railway UTS
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Online Railway Ticket : आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरले आहे. विशेष म्हणजे रल्वेकडून पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात सोयी सुविधा देखील उपलब्ध करून दिलया जात आहेत. आता रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी तासंतास रांगेत उभारण्याची गरज भासत नाही. तुम्ही ऑनलाईन रेल्वेचे तिकीट बुक करू शकता. पण ऑनलाईन सुविधेचा लाभ घेताना रेल्वेचे काही नियम पाळावे लागतात. त्यापैकीच एक महत्वाची अट रेल्वेकडून रद्द करण्यात आली आहे.

साधारण तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मासिक पास (Online Railway Ticket) घरी बसून काढता येणार असून यासाठी असणारी पाच किलोमीटरची अट रद्द करण्यात आली आहे. यू.टी.एस. अ‍ॅपवरुन ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. एवढेच नाही तर अशा पद्धतीने तिकीट काढल्यास 3 टक्के बोनसही मिळणार आहे. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया…

कोणती अट केली रद्द ?

यापूर्वी जेव्हा यूटीएस ॲप द्वारे तुम्ही तिकीट बुक करीत असताना पाच किलोमीटरची मर्यादा देण्यात आली होती. स्टेशनच्या परिसरात पाच किलोमीटरच्या आतच हे तिकीट काढता येत होते. मात्र ही महत्त्वपूर्ण अट आता रद्द करण्यात आलेली आहे. तुम्ही कितीही अंतरावर असाल तेव्हा हे तिकीट (Online Railway Ticket) आता काढू शकता. आरक्षण तिकिटासारखे घरी बसून जनरल तिकीट यू.टी.एस.अ‍ॅपवरुन आता काढता येणार आहे.

नक्की काय आहे सुविधा ? (Online Railway Ticket)

  • जर तुम्हाला रेल्वेच्या सुविधेचा लाभ घेताना ३ टक्के बोनस मिळवायचा असेल तर त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मोबाईल ॲप्लिकेशन यू.टी.एस वरून सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून अनरिझव्हड तिकीट सिस्टीम म्हणजेच यु टी एस हे ॲप्लिकेशन डाऊनलोड (Onilie Railway Ticket) करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये लॉगिन करायला लागेल.
  • या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्हाला कधीही घरबसल्या जनरल तिकीट पास आणि प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
  • शिवाय हे तिकीट काढण्यासाठी तीन टक्के बोनस ही रेल्वे कडून देण्यात येतो.
  • शिवाय सर्व सुविधा या ऑनलाईन आणि डिजिटल पेमेंट द्वारे होत असल्यामुळे सुट्ट्या पैशांची कटकटही राहणार नाही. शिवाय वेळेची बचतही यामुळे होणार आहे .
  • या ॲपमुळे पी. एन.आर स्टेटस, हॉटेल बुकिंग, ट्रेनचं रनिंग स्टेटस, सीट उपलब्धता, अल्टरनेटिव्ह ट्रेन (Online Railway Ticket) याचीही माहिती मिळणार आहे.