हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Oppo K13 5G – ओप्पोने भारतात आपला नवीन K-सीरिजमधील स्मार्टफोन Oppo K13 5G लाँच केला आहे. हा स्मार्टफोन अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर सादर केला जाणार आहे. कंपनीने याच्या लाँचपूर्वीच याचे स्पेसिफिकेशन्स आणि काही खास फीचर्स उघड केले आहेत. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, हा फोन 20,000 च्या खालील किंमतीत बाजारात उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे ग्राहकांना दमदार फोन खरेदी करण्याची हि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तर चला या स्मार्टफोनच्या फीचर्स अन किमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Oppo K13 5G चे फीचर्स –
Oppo K13 5G मध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे , याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1200 निट्स आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह, या फोनमध्ये हार्डवेअर-लेव्हल ब्लू लाईट प्रोटेक्शनही दिले जाईल, ज्यामुळे डोळ्यांचे नुकसान कमी होईल. या डिव्हाइसमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि इन्फ्रारेड रिमोट कंट्रोलचा सपोर्टसुद्धा दिला गेला आहे. फोनमध्ये Qualcomm चा नवीन Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर दिला गेला आहे. यासोबत 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज दिलं जाऊ शकतं. सर्वात आकर्षक बाब म्हणजे यामध्ये 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असून, ती 80W SUPERVOOC फ्लॅश चार्जिंगद्वारे फक्त एक तासात पूर्ण चार्ज होऊ शकते.
कॅमेरा –
कॅमेरा सेटअपबाबत बोलायचं झालं, तर Oppo K13 5G मध्ये 50 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाईल. यामध्ये AI Clarity Enhancer, AI Unblur, AI Reflection Remover आणि AI Eraser सारखे स्मार्ट AI फिचर्स मिळतील. यामुळे फोटो अधिक स्पष्ट आणि सुंदर दिसतील. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित ColorOS 15 वर चालेल. फोनला डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट बनवण्यासाठी IP65 रेटिंग देण्यात आले आहे. हा डिव्हाइस Ice Purple आणि Prism Black या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होईल.




