राज्यभरामध्ये मोठमोठे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड असे प्रकल्प सांगता येतील. मुंबई ते गोवा हे अंतर केवळ ६ तासांमध्ये कपता येणार आहे . कोकण हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाबाबतची रूपरेषा राज्य रस्ते महा विकास मंडळाने जाहीर केली आहे. चला जाणून घेऊया ..
पुलांची निविदा नव्याने काढण्यात आली
कोकणच्या बाबतीत बोलायचे झाले तर मुंबई गोवा महामार्ग गेली सतरा वर्ष रखडलेला आहे तर सागरी महामार्ग तीस वर्षांपासून रखडलेला आहे. सागरी महामार्गावर रखडलेल्या आगरदांडा, बाळकोट- रेवस आणि दाभोळ- जयगड या पुलांची निविदा नव्याने काढण्यात आली आहे. या दोन महामार्गांची स्थिती अशी असताना आता कोकणवास यांना आणखी एका महामार्गाचे आमिष सरकारने दाखवले आहे.
68 हजार 720 कोटी खर्च अपेक्षित
या महामार्गाची लांबी 376 किलोमीटर असून या प्रकल्पासाठीचा एकूण खर्च 68 हजार 720 कोटी इतका येणार आहे. तसेच हा महामार्ग सहा पदरी करण्यात येणार असून दोन सर्विस रोड असणार आहेत. या महामार्गावर एकूण 41 बोगदे 51 मोठे ब्रिज आणि 68 ओवरपास असणार आहेत. तीनही महामार्ग एकमेकाला जोडले जाणार आहेत.
90 किलोमीटरचे अंतर होणार कमी
हा महामार्ग सर्वात जलद असेल आणि बारा तासावरून प्रवासाची वेळ ही सहा तासांवर येईल अशी घोषणा प्रकल्प अहवालात करण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्ग आणि सागरी महामार्ग याचे अंतर 460 km इतका आहे मात्र हा नवा महामार्ग 376 किलोमीटर लांबीचा असल्याने 90 किलोमीटरचा अंतर कमी होणार आहे त्यामुळे कोकण रेल्वे प्रमाणे हा महामार्ग अधिक सरळ असणार आहे.
अटल सेतूवरून अलिबाग शहाबाज इथे पहिला टप्पा आहे. तिथून पुढे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यंत हा महामार्ग जाणार आहे. महामार्गाच्या मार्गीका या सहा असून 100 मीटर रुंदीचा हा महामार्ग असेल. कोकणातील तालुक्यातील या महामार्गाचा प्रवास होईल. मुंबई गोवा महामार्ग आणि सागरी महामार्ग या दोन महामार्गांच्या मधून जाणारा हा महामार्ग आहे. इंटरचेंज येथे वाहने प्रवेश करू शकतील तसेच बाहेर पडू शकतील
‘या’ भागातून जाणार मार्ग
अलिबाग ,शहाबाद, रोहा, घोसळे, माणगाव, मढेगाव, मंडणगड, केळवट, दापोली, वाकवली, गुहागरशहर, रत्नागिरी, गणपतीपुळे, राजापूर, भालवली, देवगड शहर, मालवण शहर ,कुडाळ, सावंतवाडी शहर, वेंगुर्ले बांदा येथून हा महामार्ग मार्गस्थ होणार आहेत 41 बोगदे 21 मोठे पूल आणि 50 छोटे पूल यांचा यामध्ये समावेश असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गासाठी 3792 हेक्टर जमिनीचा संपादन केले जाणार आहे यातील 146 हेक्टर वन जमीन आहे केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे पर्यावरण विभागाच्या सूचना लक्षात घेऊन आलेखणात काही बदल करण्यात आले आहेत.