Pahalgam Attack : भारत-पाक तणावात चीनची उडी ! पाकिस्तानला दिलं धोकादायक PL-15 मिसाइल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pahalgam Attack : पहलगाममधील अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव शिगेला पोहोचला आहे. अशातच पाकिस्तानच्या मदतीसाठी चीनने थेट मैदानात उडी घेतली आहे. पाकिस्तानला अत्याधुनिक PL-15 लाँग रेंज एअर-टू-एअर मिसाइल्स* पुरवून चीनने आपली बाजू स्पष्ट केली आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव

सध्याच्या घडामोडी पाहता भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कधीही युद्धात(Pahalgam Attack) रूपांतरित होऊ शकतो, अशी शक्यता आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्तवली जात आहे. चीनकडून पाकिस्तानला 100 हून अधिक PL-15 VLRAAM मिसाइल्स देण्यात आल्या आहेत. यांची रेंज तब्बल 200 किलोमीटर असून, यापूर्वी वापरण्यात आलेल्या PL-12 (100 किमी रेंज) पेक्षा दुप्पट आहे.

JF-17 थंडरमध्ये मिसाइल फिटिंग पूर्ण

पाकिस्तानच्या एअरफोर्सने PL-15 ला आपल्या JF-17 थंडर ब्लॉक-3 फाइटर जेटमध्ये बसवलं आहे. शिवाय विंग टिप्सवर PL-10E WVRM प्रकाराच्या शॉर्ट रेंज हाय-ऑफ-बोरसाईट क्षमतेच्या मिसाइल्सही दिसत आहेत.

चीन-पाक गुप्त बैठक, आभारही व्यक्त

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि चिनी राजदूत जियांग जैदोंग यांच्यात अलीकडेच बैठक झाली. यामध्ये सुरक्षा आणि भागीदारीविषयक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर पाकिस्तानने चीनचे उघडपणे आभार मानले.

यूएनमध्येही चीनचा पाठिंबा

चीनकडून पाकिस्तानला केवळ शस्त्रास्त्र नाही, तर संयुक्त राष्ट्रात वीटो शक्तीचा वापर करत राजकीय पाठबळही मिळतं. आधीही चीनने अनेक वेळा भारतविरोधी प्रस्ताव अडवण्याचा प्रयत्न केला आहे.

पहलगाम हल्ल्याचे अमानवी सत्य

दरम्यान, पहलगामच्या हल्ल्यात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हल्ल्यात ठार झालेल्या 26 पर्यटकांपैकी सुमारे 20 जणांच्या पॅन्ट्स कमरेखाली खेचलेल्याअवस्थेत आढळल्या. त्यांची चेन उघडी होती, अशी माहिती प्राथमिक तपासणीत समोर आली. दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वी धर्माची खातरजमा केली असावी, अशी भीती यामागे व्यक्त होत आहे.

भारताच्या सीमारेषेवर तणाव वाढत असतानाच, चीनची पाकिस्तानला मिळालेली पाठराखण ही भारतासाठी मोठी कूटनीतिक आणि सुरक्षेची आव्हानं उभी करत आहे. PL-15 सारख्या मिसाइल्समुळे आकाशातलं युद्ध अधिक घातक होण्याची शक्यता आहे.