Pahalgam Attack : काश्मीरमध्ये अचानक आलेल्या इस्रायली अधिकाऱ्यांमुळे पाकिस्तानच्या गोंधळलेल्या राजकारणाला आणखी हादरा बसला आहे. भारताचा निकटचा मित्र देश इस्रायलचे 15-20 अधिकारी अत्याधुनिक उपकरणांसह काश्मीरमध्ये दाखल झाल्याचे वृत्त समोर आले असून, यामुळे पाकिस्तानमधील मीडिया आणि गुप्तचर संस्थांची चिंता वाढली आहे.
इस्रायली ‘स्टाइल’ धोरण भारताच्या हाती? (Pahalgam Attack)
पाकिस्तानमधील समा टीव्ही या माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, भारताने आता इस्रायली पद्धतीचा गुप्त अभियानाचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले असून, यासाठी इस्रायली अधिकाऱ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. भारत सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली, तरी पाकिस्तानमध्ये या हालचालींनी खळबळ माजवली आहे.
दहशतवादविरोधी कारवायांमध्ये अमेरिका पण उतरली
अमेरिकेनेही पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताला (Pahalgam Attack) मदतीचे आश्वासन दिले आहे. या भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेची गुप्तचर मदत भारतासोबत असणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाणी बंदीची तयारी, पाकिस्तानसाठी आणखी संकट? (Pahalgam Attack)
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या पाण्यावर बंधने घालण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, जल सिंधु करार स्थगित करण्यावर चर्चा झाली. या बैठकीत पाणी रोखण्यासाठी तीन टप्प्यांतील पर्यायांवर (अल्पकालिक, मध्यकालिक व दीर्घकालिक) सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
‘अब की बार’ पाकिस्तानवर सरळ धडक?
भारताकडून युद्ध जाहीर झालेलं नसतानाही, इस्रायल आणि अमेरिकेसारख्या (Pahalgam Attack) शक्तिशाली मित्रांचा पाठिंबा मिळाल्याने पाकिस्तानमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. गुप्त मोहीम, दहशतवादविरोधी कारवाया आणि पाण्यावर नियंत्रण – या सगळ्यांनी मिळून पाकिस्तानच्या संकटात भर पडली आहे.




