Pahalgam Attack : बांदीपोऱ्यात चकमकीत लष्कर-ए-तोएबाचा कमांडर ठार, सुरक्षा दलांची मोठी कामगिरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pahalgam Attack : बांदीपोऱ्यात चकमकीत लष्कर-ए-तोएबाचा कमांडर ठार, सुरक्षा दलांची मोठी कामगिरी22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये असून, या हल्ल्याचा पहिला बदला शुक्रवारी जवानांनी घेतला आहे. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील कुलनार बाजीपुरा भागात झालेल्या जोरदार चकमकीत लष्कर-ए-तोएबाचा कमांडर अल्ताफ लल्ली याला (Pahalgam Attack) ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

चकमकीचा संपूर्ण घटनाक्रम (Pahalgam Attack)

सुरक्षा यंत्रणांना कुलनार बाजीपुरा भागात दहशतवादी लपल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि CRPF ने संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. परिसराला पूर्णतः घेराव घालण्यात आला. शोधमोहीम दरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनी तत्काळ प्रत्युत्तर देत कारवाई केली.

ही चकमक सकाळपासून सुरु होती. जोरदार गोळीबार सुरू असताना जवानांनी शर्थीने लढत अल्ताफ लल्ली या कुख्यात दहशतवाद्याचा खात्मा केला. लल्ली हा लष्कर-ए-तोएबाचा वरिष्ठ कमांडर होता आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होता. पहलगाम हल्ल्याशी (Pahalgam Attack) संबंधित असलेल्या ‘रेजिस्टेंस फ्रंट’ या लष्करशी संलग्न गटाचा तो महत्वाचा सदस्य मानला जात होता.

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची कारवाई

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. जम्मू-काश्मीरमध्ये उच्च सतर्कता पाळण्यात येत आहे. विविध ठिकाणी शोधमोहीमा राबवून दहशतवाद्यांना पकडण्याचे किंवा ठार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नियंत्रण रेषेवरही तणाव

दुसरीकडे, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत. २५ एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील काही भागात गोळीबार केला. भारतीय सैन्याने याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. सीमावर्ती भागातही सतर्कता वाढवण्यात आली असून, कोणताही घातपात रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत.

बांदीपोऱ्यातील ही कारवाई सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे. लष्कर-ए-तोएबाचा कमांडर ठार झाल्याने दहशतवाद्यांच्या मनोबलावर मोठा परिणाम होणार आहे. भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, देशाच्या सुरक्षेशी खेळणाऱ्यांना कधीही माफ केलं जाणार नाही