Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यातील सर्वात मोठा पुरावा पुण्याच्या पर्यटकाच्या मोबाईलमध्ये; रिल्समध्ये कैद झाले दहशतवादी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pahalgam Attack : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या भीषण हल्ल्यात २७ पर्यटकांचा बळी गेला असून तपास यंत्रणा अलर्ट मोडवर कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर (Pahalgam Attack) एक धक्कादायक आणि अत्यंत महत्त्वाचा पुरावा समोर आला आहे. तोही पुण्यातील पर्यटकाच्या मोबाईलमधून!

बेताब व्हॅलीत शूट केलेल्या रिल्समध्ये कैद झाले दहशतवादी

पुण्यातील देहूरोड परिसरातील रहिवासी श्रीजीत रमेशन हे कुटुंबासह काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. पहलगामपासून अवघ्या ७.५ किमी अंतरावर असलेल्या बेताब व्हॅलीमध्ये फिरताना त्यांनी आपल्या मुलीचा एक छोटासा व्हिडिओ रिल्स शूट केला. याच रिल्समध्ये दोन संशयित दहशतवादी (Pahalgam Attack) त्यांच्या मागे जाताना स्पष्ट दिसून येत आहेत.

NIA चा तपास सुरू, पुरावा ठरू शकतो ‘गेमचेंजर’

श्रीजीत यांनी हा व्हिडिओ आणि संबंधित माहिती नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीला (NIA) दिली असून, एजन्सीने याची सखोल तपासणी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या फोटोंद्वारे दहशतवाद्यांची (Pahalgam Attack) ओळख पटवणे शक्य होऊ शकते आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यास मोठी मदत होणार आहे.

महत्वाचे प्रश्न निर्माण

या व्हिडिओमुळे अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात:

  • हे दहशतवादी आधीपासूनच बेताब व्हॅलीमध्ये वास्तव्यास होते का?
  • त्यांनी या भागाची रेकी करूनच पहलगाममध्ये हल्ला करण्याचा निर्णय घेतला का?
  • पहलगाममधील पर्यटकांची संख्या अधिक असल्यामुळेच त्यांनी ते ठिकाण निवडलं का?

हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने एक व्हिडिओ जाहीर करत “सदैव तयार, सदैव सतर्क” असा स्पष्ट संदेश दिला आहे.