Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या भ्याड हल्ल्यानंतर देशातील वातावरण तणावपूर्ण बनले असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्यानंतर स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हल्ल्याचा बदला घेतला जाईल.” या विधानामुळे एकाच वेळी जनतेमध्ये संताप उसळला (Pahalgam Terror Attack) असून, दुसरीकडे केंद्र सरकारच्या पुढील कृतीकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
राजकीय पक्षांची एकजूट (Pahalgam Terror Attack)
दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. सर्वपक्षीय बैठकांमध्ये “सरकारने कठोर निर्णय घ्यावे आणि देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,” असा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण पूर्णपणे युद्धजन्य बनत चालले आहे.
पाकिस्तानकडून उघड उघड धमक्या (Pahalgam Terror Attack)
संपूर्ण परिस्थितीला अधिक धोकादायक वळण देणारे वक्तव्य नुकतेच पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी केले. “भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या चार दिवसांत युद्ध होऊ शकते,” असा दावा करत त्यांनी थेट युद्धाची शक्य तारीखच जाहीर केल्यासारखे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही खळबळ उडाली आहे. अनेक तज्ज्ञांनी हे वक्तव्य फक्त मनोबल खच्ची करण्यासाठी केलेले असले, तरी भारताने त्याकडे गांभीर्याने पाहिले आहे.
भारताची सैन्य सज्ज (Pahalgam Terror Attack)
भारताची तिन्ही सैन्यदलं – थलसेना, नौसेना आणि वायूसेना – युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सीमारेषेवर लष्करी हालचालींना गती मिळाली असून, उच्च पातळीवर नियमित युद्धाभ्यास सुरू आहे. लष्करप्रमुखांनी युद्धासाठी मानसिक आणि भौतिकदृष्ट्या सज्ज राहण्याचे आदेश आधीच दिले आहेत.
सिंधू पाणी अडवण्याचा निर्णय
दुसऱ्या बाजूला, भारताने सिंधू जल संधीच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा विचार करण्याचे संकेत दिल्यानंतर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “पाण्याचा मार्ग रोखणे म्हणजे थेट युद्ध पुकारणे,” असा आक्षेप पाक सरकारकडून नोंदवला जात आहे. पाकिस्तानच्या या पोकळ धमक्यांना भारताकडून कोणतीही भीती न दाखवता ठाम आणि निर्णायक पवित्रा घेतला जात आहे.
जनतेमध्ये चिंता
सामान्य जनतेत सध्या एकीकडे पाकिस्तानविरोधात तीव्र भावना उमटत आहेत, तर दुसरीकडे युद्ध होईल का, याबाबत चिंता आणि उत्सुकता आहे. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली तर त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर कसा होईल, याबाबत चर्चा सुरू आहे.
सध्याची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. एकीकडे भारत बदला घेण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानकडून सतत धमक्या दिल्या जात आहेत. युद्ध टळणार की प्रत्यक्षात संघर्ष होणार? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, केंद्र सरकार आणि भारतीय लष्कर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.




