शाल विक्रेते, घोडेस्वार आणि दहशतवादी यांच्यात थेट कनेक्शन? शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा खळबळजनक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pahalgam Terror Attack: 22 एप्रिल 2025 रोजी देशभराला हळहळ करायला लावणारी एक घटना भारतामध्ये घडली. काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर जीवघेणा हल्ला झाला. अतिरिक्यांकडून झालेल्या हल्ल्यामध्ये तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनेमध्ये पर्यटकांना हिंदू आहे की मुस्लिम ? असा प्रश्न विचारला गेला आणि हिंदू पर्यटकांची जाणून बुजून हत्या करण्यात आली. दुर्दैवानं या घटनेमध्ये कानपूर मधील शुभम द्विवेदी यांची देखील हत्या करण्यात आली. त्यानंतर शुभम यांची पत्नी एशान्या यांनी धक्कादाय खुलासा केला आहे. या नव्या खुलासामुळे (Pahalgam Terror Attack) बहलगांमधील हल्ल्याविषयी अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

… तोपर्यंत काश्मीर सुरक्षित (Pahalgam Terror Attack)

एशान्यायांनी एका माध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या त्यांचे दिवंगत पती शुभम यांनी घोड्याच्या मालकाला विचारलं की वर नेटवर्क आहे की नाही? तो म्हणाला की पूर्ण नेटवर्क आहे. जर त्यांना नेटवर्क नाही म्हणून सांगितलं असतं तर आम्ही तिथे गेलोच नसतो. हल्ला झाला नव्हता तोपर्यंत आम्ही काश्मीरमध्ये सुरक्षित होतो आम्हाला काश्मीर सुरक्षित वाटत होतं.

पुढे त्या म्हणाल्या थोड्या अंतरावर आम्हाला भारतीय सेनेतील जवान दिसत होते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांवर आम्हाला संशय आलाच नाही. आता मला लक्षात येत आहे की तेथील लोक विचारत होती तुमच्या सोबत कोण कोण आहे? त्या लोकांनी साधे कपडे म्हणजे जीन्स घातली होती. त्यांच्याकडे कोणतीच शस्त्र नव्हती. दहशतवाद्यांना शस्त्र पुरवण्यात आली तिथं जी लोक शॉल विकत होते त्यांनीच दहशतवाद्यांना शस्त्र पुरवली असावीत असं मला वाटत आहे. ‘ अशी माहिती अशांना यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मेंढपळाची संशयास्पद वर्तणूक … (Pahalgam Terror Attack)

पुढे माहिती देताना त्या म्हणाल्या की एक माणूस तिथे एकटाच मेंढ्या चरत होता तो इतक्या मोठ्या शेतात एकटाच मेंढा चरत होता ज्याचा काहीच अर्थ नव्हता. मला माहित नाही की तो संशयास्पद होता की नाही पण त्याने पूर्णपणे झाकलेले कपडे घातले होते कोणास ठाऊक व कपड्यांमध्ये काहीतरी लपवत असेल अशी शंका देखील एशान्या यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की आमचे कुटुंबीय वर जाण्यासाठी घाबरत होते. पण घोडेस्वारांना सांगितलं पठारावर फार सुंदर वातावरण आहे. यामुळे घोडे मालकासोबत आमचे वाद देखील झाले. माझे सासरे त्याला म्हणाले हवं तर तू पूर्ण पैसे घे पण आम्ही पठारावर जाणार नाही. तेव्हा तो म्हणू लागला पैशांची गोष्ट काहीही नाही जवळपास दहा मिनिटे वाद झाल्यानंतर आम्ही पठारावर गेलो अशी सत्य परिस्थिती एशान्या यांनी सांगितले त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आता या हल्ल्याबाबत नवीन प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.