Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश , यादी आली समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा देश हादरला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारात ३० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश असून, काही जखमी पर्यटक पुणे आणि मुंबई येथील आहेत.

सूत्रांनुसार, दहशतवाद्यांनी (Pahalgam Terrorist Attack) पर्यटकांवर तब्बल 50 हून अधिक राउंड गोळीबार केला. 10 दहशतवाद्यांचा सहभाग या हल्ल्यात होता, यातील सहा स्थानिक तर चार विदेशी होते. हा हल्ला पाकिस्तानप्रेरित कटाचा भाग असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या बंदी घातलेल्या संघटनांचा या कटात सहभाग असल्याचे बोलले जात आहे.

“महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश

या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 26 जणांची नावे समोर आली असून यात महाराष्ट्रातील सर्वाधिक सहा जणांचा समावेश आहे. तर कर्नाटक राज्यातील तसेच गुजरात राज्यातील प्रत्येकी तीन पर्यटक मृत्युमुखी पडले असून इतर 17 जण जखमी आहेत जखमींमध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सध्या मिळते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने, कौस्तुभ गंगोटे, संतोष जगदाळे, दिलीप देसले यांचा समावेश आहे.

नाव विचारल्यावर गोळी झाडली

कानपूरच्या शुभम द्विवेदीने अवघ्या दोन महिन्यांपूर्वी, १२ फेब्रुवारीला लग्न केले होते. पत्नीबरोबर हनीमूनसाठी पहलगामला गेलेला शुभम, आता परतणारच नाही. चुलतभाऊ सौरभ द्विवेदी यांनी सांगितलं की , “काकांना फोन करून वहिनीने सांगितलं की शुभमच्या डोक्यात गोळी लागली… नाव विचारल्यावर गोळी झाडल्याचं सांगण्यात आलं.” शुभमसारख्या तरुणाचं अशा पद्धतीने जाणं, प्रत्येकाच्या काळजाला चटका लावून गेलं.

हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील २६ वर्षीय लेफ्टनंट विनय नरवाल यांचेही याच हल्ल्यात निधन झाले. अवघ्या १६ एप्रिलला त्यांचं हिमांशीसोबत लग्न झालं होतं. केरळमधील कोची येथे पोस्टिंग झालेल्या विनयने आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र त्यांचा हनीमूनच त्यांचा अखेरचा प्रवास ठरला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव शोकाकुल आहे.

बालासोर, ओडिशामधील प्रशांत सत्पथी हल्ल्यात मृत्युमुखी पडले. त्यांच्या भावाच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू काय सांगत होते, ते शब्दांत मांडणं अशक्य. गुजरातमधील शैलेश कडतिया हेही या हल्ल्यात मृत झाले, त्यांच्या पत्नी व दोन मुलांनी मात्र थोडक्यात जीव वाचवला.