Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्यानंतर बुकिंग्स रद्द, पण महाराष्ट्र टूर ऑपरेटर्सचा निर्णय चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात जम्मू-काश्मीर पर्यटनावर भीतीची छाया पसरली आहे. पर्यटक मोठ्या संख्येने त्यांच्या बुकिंग्स रद्द करत असून, ट्रॅव्हल एजन्सीजकडे रद्दीकरणासाठी सतत फोन येत आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील टूर ऑपरेटर्सने एक महत्वाचा आणि ठाम निर्णय घेतला आहे. “बुकिंग रद्द नाही, गरजूंना सुविधा आणि इच्छुकांना संधी”

टूर ऑपरेटर्सचा संदेश (Pahalgam Terrorist Attack)

राजा राणी ट्रॅव्हल्सचे संचालक अभिजित पाटील यांनी स्पष्ट सांगितलं, “हो, हल्ला निश्चितच धक्कादायक आहे. पण काश्मीरसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा घटना नव्या नाहीत. आम्ही गोंधळून जाणार नाही. ज्या पर्यटकांना जायचं आहे त्यांचं बुकिंग आम्ही कायम ठेवणार आहोत. आणि जे रद्द करू इच्छितात, त्यांनाही आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत.”

हॉटेल्स आणि फ्लाईट्सचे दर अर्ध्यावर

हल्ल्यानंतर दिल्ली-श्रीनगर विमानभाड्यात आणि स्थानिक हॉटेल दरात लक्षणीय घट (Pahalgam Terrorist Attack) झाली आहे. काही ट्रॅव्हल एजंट्सच्या मते, हॉटेल्समधून बुकिंग रद्द करण्याचे शंभरहून अधिक कॉल्स आले आहेत. अनेक हॉटेल मालकही या अनपेक्षित घसरणीमुळे अडचणीत आले आहेत.

दिल्ली ते डोंबिवली – बुकिंग्सचा ओघ थांबला

दिल्लीतील ट्रॅव्हल एजंट आशिष शर्मा यांनी सांगितले, “पुढील दहा दिवसांसाठी आमच्या सर्व टूर कॅन्सल झाल्या आहेत. सुमारे ३० ग्रुप टूर होत्या. परंतु पहलगाम घटनेने सगळं स्थगित झालं.” महाराष्ट्र, गुजरात, उत्तर भारतातील अनेक एजन्सीजना ग्राहकांच्या सतत रद्दीकरणासंदर्भात कॉल्स येत आहेत.

“२०१६ साली अशा हल्ल्यानंतर कुणीही काश्मीरला परतला (Pahalgam Terrorist Attack)नसता. पण आता परिस्थिती बदलतेय. कलम ३७० रद्द झाल्यानंतर स्थानिक जनतेत दहशतवाद्यांविषयी रोष आहे. सोशल मीडियामुळे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचते आहे. म्हणून आम्ही परतीचं नव्हे, पुढचं पाऊल उचलतोय,” असंही पाटील यांनी ठामपणे सांगितलं. एकीकडे संपूर्ण देश हल्ल्याच्या धक्क्यात असताना, महाराष्ट्र टूर ऑपरेटर्सचा हा निर्णय पर्यटन व्यवसायासाठी एक ‘साहसी पाऊल’ ठरत आहे.