Pahalgam Terrorist Attack : मोठी बातमी ! पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोन आरोपींच्या घरात स्फोट, लष्कर-ए-तोयबाशी संबंध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pahalgam Terrorist Attack : पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाबळांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. या हल्ल्याचे आरोपी आसिफ शेख आणि आदिल ठोकर यांच्या घरांमध्ये भीषण स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. हे दोघेही कुख्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

बैसरन व्हॅली हल्ल्यात दोघांचाही सहभाग

22 एप्रिल रोजी बैसरन घाटीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोघेही सहभागी होते, असे स्पष्ट झाले आहे. या (Pahalgam Terrorist Attack) हल्ल्यानंतर दोघेही फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षाबळांकडून मोठे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या भयानक हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

आदिल ठोकरचा पाकिस्तान कनेक्शन

आदिल ठोकर दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील गुरी गावचा (Pahalgam Terrorist Attack) रहिवासी आहे. त्याचे घर स्फोटाद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. अनंतनाग पोलिसांनी नुकतेच आदिलचा स्केच जाहीर केला होता. तो 2018 मध्ये पाकिस्तानमध्ये गेला होता आणि तेथे दहशतवादाचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातून परतल्यानंतर त्याने परकीय दहशतवाद्यांना मदत केली आणि बैसरन घाटीमध्ये पोहोचवले.

दक्षिण काश्मीरमध्ये मोठे ऑपरेशन सुरू

आसिफ शेख याचे घर मोगहामा भागात आहे. त्याच्या घरातही स्फोट घडवून आणण्यात आला. या भागात एका संशयास्पद बॉक्सचा शोध लागला असून त्यामध्ये वायर्स होते. सुरक्षाबळांनी ते बॉक्स तात्काळ निष्क्रिय केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या स्फोटात घराचे काही नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घाटीमध्ये ठिकठिकाणी शोधमोहीम (Pahalgam Terrorist Attack)

घाटीमध्ये विविध भागांमध्ये सध्या दहशतवादविरोधी ऑपरेशन वेगाने सुरू आहे. बांदीपोरा भागात शुक्रवारी सकाळी मुठभेड़ सुरू झाली असून ती अद्याप सुरू आहे. सुरक्षाबळांकडून विविध ठिकाणी संशयितांची धरपकड केली जात आहे आणि चौकशी केली जात आहे. सरकारकडून अद्याप अधिकृत निवेदन आलेले नसले तरी स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.