Pahalgam Terrorist Attack : काश्मीरच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत तिन्ही सैन्यदलांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणारे काही तास अत्यंत निर्णायक (Pahalgam Terrorist Attack) ठरण्याची शक्यता आहे.
पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी Pahalgam Terrorist Attack हल्ल्यात 26 निरपराध भारतीयांचे प्राण गेले. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा तात्काळ अर्धवट सोडून दिल्लीत परत येत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संरक्षण मंत्रालयात तातडीची बैठक घेण्यात आली, ज्यात तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत लष्कर, नौदल आणि वायूदलाला ‘तत्परते’च्या स्थितीत राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची कारवाई आवश्यक वाटल्यास ती तातडीने राबवता येईल, अशी तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे भारत सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकसारखा निर्णय घेईल का, यावर चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हल्ला झालेल्या ठिकाणाला भेट दिली असून, घटनास्थळाची सविस्तर माहिती घेतली आहे. दिल्लीत संरक्षण मंत्री, अजित डोवाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सलग बैठका सुरू असून पंतप्रधान मोदी यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होत आहेत. यामुळे आगामी काळात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.