pahalgam terrorist photo : २२ एप्रिल रोजी काश्मीरच्या निसर्गरम्य बैसरन व्हॅलीमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंध गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला असून अनेक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये महिलांचा, वृद्धांचा व विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.
या धक्कादायक घटनेनंतर आता हल्ल्यातील एका दहशतवाद्याची पहिली एक्सक्लूसिव्ह प्रतिमा समोर आली आहे. या चित्रात तो हातात बंदूक घेऊन, लष्करी वेशात दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, २ ते ३ जण लष्करी पोशाखात बैसरनच्या परिसरात आले आणि पर्यटकांवर थेट गोळीबार सुरू केला.
लष्कर-ए-तैयबाच्या ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ने हल्ल्याची जबाबदारी (pahalgam terrorist photo) स्वीकारली आहे. सध्या सुरक्षा यंत्रणा या हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन राबवत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी आपल्या सौदी अरेबिया दौऱ्यातून दिल्लीला परत येत तातडीने उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आणि पुढील कारवाईबाबत चर्चा झाली.
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची नावं (pahalgam terrorist photo)
सुशील नैथ्याल, सैयद आदिल हुसैन शाह, हेमंत सुहास जोशी, विनय नरवाल, अतुल श्रीकांत मोनी, नीरज उधवानी, बिटन अधिकारी, सुदीप न्यूपाने, शुभम द्विवेदी, प्रशांत कुमार सत्पथी, मनीष रंजन (आबकारी निरीक्षक), एन. भूषण, सुमित परमार, यतेश परमार, तगेहालिंग (एअर फोर्स कर्मचारी), आणि शैलेशभाई हिम्मतभाई कलाथिया.
प्रत्यक्षदर्शींचा हलवून टाकणारा अनुभव
“लोक घोड्यावरून फिरत होते, काहीजण फोटो घेत होते. अचानक गोळीबार सुरू झाला. महिलांच्या किंकाळ्या, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोक, मदतीसाठी धावताना रडणारी मुले… हे दृश्य कधीच विसरणार नाही,” असं एका जखमी पर्यटकाने सांगितलं.
सुरक्षा दलांची मोठी मोहिम सुरू
हल्ल्यानंतर लगेच सुरक्षा दलांनी संपूर्ण भाग सील केला असून, डोंगराळ भागात शोधमोहीम राबवली जात आहे. नागरिकांना शक्यतो परिसरात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.




