पाकिस्तानमध्ये सध्या अंतर्गत अशांतता शिगेला पोहोचली असून, देशाच्या नकाशात लवकरच मोठे बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत. बलोचिस्तानने थेट स्वतंत्र देशाची घोषणा करून पाकिस्तान सरकारला हादरवून सोडलं असतानाच, आता सिंध प्रांतातही स्वतंत्रतेची लाट उसळली आहे. या घटनांनी पाकिस्तानचं भवितव्य अधिकच धोक्यात आलं असून, पाकिस्तानचे दोन नव्हे तर तीन तुकडे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
9 मे 2025 रोजी बलोच नेते मीर यार बलोच यांनी पाकिस्तानपासून बलोचिस्तानच्या स्वातंत्र्याची अधिकृत घोषणा केली. त्यांनी थेट भारताला बलोचिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख देण्याचे आणि नवी दिल्लीत दूतावास उघडण्याचे आवाहन केले. तसेच, संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानमधून लष्करी माघारीसाठी शांतिसेना पाठवावी, अशीही जोरदार मागणी केली.
मीर यार बलोच यांनी ट्वीट करत सांगितलं की, “बलोचिस्तानचं स्वातंत्र्य हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही भारतासारख्या मित्र राष्ट्रांकडून या लढ्याला समर्थन आणि मदतीची अपेक्षा करतो.” बलोचिस्तान पाकिस्तानचा सर्वात मोठा भूभाग असूनही, तेथील विकासाला नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं. त्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून या भागात स्वातंत्र्याची चळवळ धगधगते आहे.
बलोचिस्तानच्या पावलावर पाऊल टाकत आता सिंध प्रांतातही ‘जय सिंध फ्रीडम मूव्हमेंट’ (JSFM) ने स्वातंत्र्यासाठी उघडपणे रस्त्यावर उतरून आंदोलन छेडलं आहे. सिंधमध्ये दीर्घ काळापासून सांस्कृतिक ओळख, हक्क, आणि स्वायत्ततेसाठी संघर्ष सुरू आहे. आता हा संघर्ष स्वतंत्र देश स्थापन करण्याच्या दिशेने वळताना दिसतोय.
Covid 19 : भारतात पुन्हा कोविडची चाहूल? केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट मोडवर; तज्ज्ञांचे स्पष्ट मत…
सिंधी आंदोलकांचा आरोप आहे की, पाकिस्तानी राज्य यंत्रणा सिंधी संस्कृतीला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. 2022 मध्ये अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालातही सिंधमधील अन्याय्य हत्याकांड आणि अमानवी मृतदेह सापडण्याच्या घटनांकडे लक्ष वेधण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, सिंध प्रांत 1936 ते 1955 पर्यंत ब्रिटिश भारताचा भाग होता, नंतर तो पाकिस्तानमध्ये विलीन करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसमोरील आव्हान अधिकच गंभीर झालं आहे. देशातील सर्वात मोठे प्रांत एकामागून एक वेगळी वाट धरत असताना, ‘वन पाकिस्तान’चं स्वप्न पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या घडामोडींवर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले असून, पाकिस्तानच्या राजकीय आणि भौगोलिक अस्तित्वावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.




