Pakistan On Pahalgam Terror Attack: सिंधूचं पाणी नाही तर रक्त वाहेल!” बिलावल भुट्टोचा भारताला उघड इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pakistan On Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला. बैसरन येथे झालेल्या या भ्याड हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांनी आपले प्राण गमावले. या घटनेने देशभरातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, यामध्ये सिंधू पाणी कराराचा आढावा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही समाविष्ट आहे.

भारताची कारवाई, पाकिस्तानची चिघळलेली प्रतिक्रिया

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात ठोस आणि निर्णायक पावले उचलली. पाकिस्तानातील (Pakistan On Pahalgam Terror Attack) दहशतवादाला थेट जबाबदार धरून, भारताने सिंधू पाणी कराराची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. हा करार 1960 साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला होता आणि तो आजवर अनेक युद्धांत टिकून राहिला होता. मात्र, पाकिस्तानच्या सातत्याने असलेल्या दहशतवादी कारवाया आणि भारतविरोधी भूमिकेमुळे भारताने आता अधिक कडक धोरण स्वीकारले आहे.

बिलावल भुट्टोंचा संतापजनक इशारा (Pakistan On Pahalgam Terror Attack)

याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री व PPP पक्षाचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताविरोधात आक्रमक आणि खळबळजनक वक्तव्य केले. एका जाहीर सभेत बोलताना म्हंटल की “मी सिंधू नदीच्या काठावर उभा राहून भारताला सांगतो, सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील. या नदीतून एकतर आमचं पाणी वाहील, नाहीतर भारताचं रक्त!”

हे विधान केवळ असंवेदनशीलच नाही, तर भारताविरोधात हिंसाचाराला उघड चिथावणी देणारे आहे. पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देश हळहळलेला असताना, अशा प्रकारचे विधान आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानची प्रतिमा मलिन करत आहे.

आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तान

सध्याच्या घडीला पाकिस्तान अनेक आर्थिक संकटांना तोंड देत आहे. विदेशी कर्ज, महागाई, बेरोजगारी आणि अन्नटंचाईने होरपळत असलेल्या या देशातील राजकीय नेत्यांकडून अशी चिथावणीखोर वक्तव्ये येणे, हे त्यांच्या हताशतेचे प्रतिबिंब आहे. बिलावल भुट्टोंसारख्या नेत्यांनी भारताची लोकसंख्या, ताकद आणि आंतरराष्ट्रीय दडपशाही लक्षात न घेता दिलेली आक्रमक वक्तव्ये, पाकिस्तानमधील (Pakistan On Pahalgam Terror Attack) आंतरराष्ट्रीय एकाकीपणाला अधिक गडद करत आहेत.

भारताची राजनैतिक कणखरता आणि आंतरराष्ट्रीय पाठिंबा

भारत सरकारने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्ध तात्काळ पावले उचलली आहेत. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे, काहींना देशाबाहेर हाकलण्याचे आदेश देणे आणि सिंधू कराराच्या पुनरावलोकनाच्या हालचाली यामुळे भारताची भूमिका अधिक ठोस झाली आहे.सिंधू कराराच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव जागतिक बँकेसमोर ठेवण्यात आला आहे. भारत आता केवळ निषेध करीत नाही, तर कृतीद्वारे पाकिस्तानला जागवण्याचा प्रयत्न करत आहे.

सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानकडून येणाऱ्या अशा धमकीवजा विधानांना गांभीर्याने घेण्याऐवजी, भारताने संयम आणि राजनैतिक परिपक्वतेने पावले उचलत जगासमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बिलावल भुट्टोंसारखे नेते भारताला धमकावत असले, तरी जगाची सहानुभूती आणि पाठिंबा भारतासोबत असल्याचे चित्र स्पष्ट आहे.