हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pakistan Train Hijack – जागतिक स्तरावर खळबळ माजवणारी धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये घडली आहे. या घटनेत पाकिस्तानच्या ट्रेनला हायजॅक करण्यात आले. आता याच घटनेची मोठी माहिती समोर आली आहे. लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे कि , बलुचिस्तानमध्ये रेल्वे अपहरण हल्ल्यात 21 प्रवासी व 4 जवानांचा मृत्यू झाला असून , या मोहिमेत सुरक्षा दलांनी 33 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. क्वेट्टाकडून पेशावरकडे जात असलेल्या जाफर एक्सप्रेसमध्ये 440 प्रवासी होते त्यातील सुरक्षा दलांनी 190 प्रवाशांची सुटका केली आहे.
प्रवाशांना बंदी बनवून त्यांच्या जीवाशी खेळ .. –
हल्ल्याचे शिकार झालेले जाफर एक्सप्रेसचे प्रवासी डोंगराळ प्रदेशातून जात असताना गुदलार आणि पिरू कुनरी येथील बोगद्यात स्फोट घडवून रेल्वे ताब्यात घेतली. हल्ल्यानंतर, ‘बलोच लिबरेशन आर्मी’ (बीएलए) या कट्टरपंथी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या गटाने या भागातील बलोच स्वातंत्र्यसंग्रामासाठी आपला विरोध व्यक्त केला आहे. हल्ल्याच्या (Pakistan Train Hijack) सुरुवातीला दहशतवाद्यांनी प्रवाशांना बंदी बनवून त्यांच्या जीवाशी खेळ सुरु केला होता. यामध्ये 21 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 4 जवान शहीद झाले. सुरक्षा दलांनी वेळेत कारवाई करून 190 प्रवाशांची सुटका केली आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला. हल्ल्यानंतर, दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांशी सातत्याने संपर्क साधला, ज्यामुळे हे स्पष्ट होते की, यामध्ये परकीय हातांचा संभाव्य सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ –
लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, “सुरक्षा दलांनी अत्यंत धैर्य आणि समर्पणाने या मोहिमेची अंमलबजावणी केली. आम्ही सर्व 33 दहशतवाद्यांना ठार केले आणि नागरिकांना सुरक्षितपणे सुटकेसाठी कारवाई केली.”
गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी केले कौतुक –
हल्ल्यानंतर (Pakistan Train Hijack) , पाकिस्तानच्या गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी सुरक्षा दलांच्या कार्याची प्रशंसा केली. “सुरक्षा दलांनी अत्यंत शौर्य आणि समर्पणाने हल्ल्यावर नियंत्रण मिळवले. हल्ल्यात सहभागी सर्व 33 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे, जो एक मोठा विजय आहे,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी एकच ठाम सांगितले की, “निरपराध मुलं आणि महिलांचा मानवी ढाल म्हणून वापर करणं अत्यंत चुकीचं आहे. या प्रकारच्या घृणास्पद कृत्यांना कुठलीही माफी नाही. या घटनेमागील सुत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल.”