Panchgani Hill Station : पावसाळ्यात ‘या’ रोमँटिक ठिकाणी घ्या गुलाबी सरींचा आनंद; जोडीदारासोबत अनुभवा स्वर्गसुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Panchgani Hill Station) ‘या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती…’ कवीने या ओळींमध्ये पावसाळ्यात मनाची जी अवस्था होते ती अगदी तंतोतंत मांडली आहे. रिमझिम पावसाच्या सरी, वाफाळलेला चहा आणि भजीसोबत जोडीदाराची साथ असेल तर जीवन सार्थक झाल्यासारखे वाटते. पाऊस पडू लागला की, आपोआप ओठांवर गाण्यांचे बोल रेंगाळू लागतात. अशा सुंदर वातावरणात आपल्या जोडीदाराला घेऊन कुठेतरी छान ठिकाणी फिरायला जावे कुणाला वाट नाही?

तुम्हालाही वाटतंय ना? तर या पावसाळ्यात तुमच्या जोडीदाराला घेऊन ‘पाचगणी’ (Panchgani Hill Station) फिरायला जा. गुलाबी सरी, धुक्याची थंड चादर आणि हिरवाईने नटलेला परिसर आपल्या जोडीदारासोबत आणखी सुंदर वाटेल. स्वर्गसुखाचा अनुभव घेत अनेक यादगार क्षण तयार करायचे असतील ‘पाचगणी’ला जरूर भेट द्या. आता पाचगणीला कसे जाल? कुठे फिरालं? कुठे रहाल? असे प्रश्न पडले असतील, तर चिंता सोडा आणि ही बातमी स्किप न करता वाचा.

गुलाबी पाचगणी (Panchgani Hill Station)

पावसाळ्यात आपल्या जोडीदारासोबत फिरायला जायचं असेल तर महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणता येईल अशा पाचगणीला भेट देणे फारच आनंददायी ठरेल. पावसामुळे हे ठिकाण अत्यंत सुंदर आणि मनाला हर्ष देणारे झाले आहे. महाबळेश्वरपासून अवघ्या काही अंतरावर असलेले ‘पाचगणी’ पर्यटकांचे अत्यंत आवडते ठिकाण असून पावसाळ्यात हे ठिकाण पहायला देशभरातून लोक येत असतात. पाचगणीचा प्रवास फार सोपा आहे. तुम्ही तुमची रस्ता, रेल्वे किंवा विमानाने प्रवास करू शकता. कसा ते जाणून घेऊ.

रस्त्याने प्रवास

जर तुम्ही मुंबईवरून पाचगणीला जात असाल तर तुम्हाला सुमारे २४४ किलोमीटर इतके अंतर कापायचे आहे. (Panchgani Hill Station) ज्याला साधारण ५ तास लागतात. याकरता, सायन – पनवेल द्रुतगती मार्ग, मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग आणि नंतर NH4 हायवेचा वापर करावा लागेल. पुढे वाई – सुरूर रोड, वाई – पाचगणी – महाबळेश्वर रोड आणि वाई – पाचगणी रोडने तुम्हाला भीम नगर, पाचगणीकडे जाता येईल.

रेल्वेने प्रवास

मुंबईहून पाचगणीला जाण्यासाठी थेट ट्रेन नसली तरी तुम्ही खेड, चिपळूण किंवा साताऱ्यावरून जाऊ शकता. या रेल्वे स्थानकांना उतरून पुढे बस किंवा प्रायव्हेट टॅक्सीने पाचगणीला जाता येते. रेल्वेनंतर पुढे उर्वरित अंतर सुमारे ३० ते ४० किलोमीटर इतके आहे. (Panchgani Hill Station) महाबळेश्वर – पाचगणीला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक साताऱ्यातील वाठार आहे. तसेच मुंबई ते सातारा रेल्वे प्रवास करून पुढे बसने जाणे देखील सोपे आहे. मात्र, प्रवासी ट्रेनला ७ तासांपेक्षा जास्त प्रवास करून पुढे बसने १ तासभर महाबळेश्वरसाठी प्रवास करावा लागतो. तिथून पुढे १९.२ किमी अंतरावर पाचगणी आहे. जिथे प्रायव्हेट रिक्षा तुम्हाला सोडतील.

विमानाने प्रवास

जर तुम्ही विमानाने पाचगणीला जाण्याचा विचार करताय तर महाबळेश्वरला सगळ्यात जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. जे महाबळेश्वरपासून १२० किलोमीटर अंतरावर आहे. (Panchgani Hill Station) मात्र, मुंबई ते पुणे हे अंतर सुमारे १५० किमी आहे. त्यामुळे, जर तुम्ही मुंबईहून पाचगणीला जाताय तर दुसरा पर्यायी मार्ग अवलंबणे फायदेशीर ठरेल.

पाचगणीत काय पहाल?

पाचगणी हे अत्यंत सुंदर पर्यटन स्थळ आहे. इथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. टेबल लँड, सिडनी पॉइंट, कास पठार यांच्याशिवाय देवराई पॉइंट, पारसी पॉइंट आणि भिलार धबधबा अद्भुत अनुभव देणारी ठिकाणे पहा. (Panchgani Hill Station) पारसी पॉइंट आणि भिलार धबधब्याजवळचा परिसर तुम्हाला फारच रोमांचकारी अनुभव देऊ शकतो. पावसाळ्यात ही ठिकाणे अनेकदा ढगांनी वेढलेली दिसतात.

कुठे रहाल?

पाचगणी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. त्यामुळे इथे राहण्यासाठी स्वस्त हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची पूर्ण सोय आहे. आवश्यक सोयीसुविधांसह अत्यंत माफक दरात इथे राहण्याची सोय होते. (Panchgani Hill Station) इथे तुम्ही स्थानिक खाद्यपदार्थ, चायनीज फूड, मेक्सिकन आणि कोरियन खाद्यपदार्थांचादेखील आस्वाद घेऊ शकता.