Pandharichi Wari 2024 : वारी म्हणजे आनंदसोहळा!! विठूनामात दंग झाले 82 वर्षीय आजोबा; उत्साह पाहून जाल भारावून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pandharichi Wari 2024) आजचं पालखी प्रस्थान सोहळा पार पडला असून आता अनेक वारकरी विठूमाऊलीच्या भेटीची ईच्छा घेऊन मार्गस्थ झाले आहेत. अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. आजच संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली आणि विठ्ठलनामाचा गजर करीत कित्येक पाऊले पंढरपुराच्या दिशेकडे वळली. वारी ही केवळ परंपरा नसून ही एक भावना आहे. अभंग गात, फुगड्या खेळत, मुखी विठूमाऊलीचे नाव घेत अनेक वारकरी अनवाणी वारीत दंग झालेले असतात. वारीमध्ये सामील होण्यासाठी वयाचे बंधन नसते आणि याचा प्रत्यय प्रत्येकवेळी येत असतो. सोशल मीडियावर सध्या एका आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यांचे वय पाहता त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे.

वारीत दंग झाले ८२ वर्षीय आजोबा (Pandharichi Wari 2024)

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी निघाले आहेत. पुन्हा एकदा तो भावनिक क्षण अनुभवण्यासाठी सारे सज्ज झाले आहेत. वारीमध्ये वारकऱ्यांचा उत्साह अगदी पाहण्यासारखा असतो. इथे जात, धर्म, वर्ण यामध्ये भेद केला जात नाही. इथे केवळ एकच जात आणि एकच धर्म. तो म्हणजे, ‘भक्ती’. दरम्यान, याच वारीत विठूनामाच्या गजरात दंग झालेल्या एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आजोबांचे वय ८२ असून त्यांचा उत्साह कमालीचा आहे.या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, हे आजोबा टाळ आणि मृदुंगाच्या तालावर नाचत, इतर वारकऱ्यांसोबत फुगड्या घालत आणि वारीतले वेगवेगळे खेळ खेळत आहेत. यावेळी त्यांची ऊर्जा आणि उत्साह त्यांची माऊलीप्रती भक्ती दर्शवत आहे. (Pandharichi Wari 2024)एखाद्या तरुण युवकासारखा उत्साह दाखवत हे आजोबा वारीमध्ये दंग झाले आहेत. जे पाहणे खरोखरच आनंददायी आहे. अशा या पंढरीच्या वारीत अगदी चिमुकल्यांपासून अशा वयाची ८० पार केलेल्या अनेक वारकऱ्यांची भेट होते.

हा प्रसंग अत्यंत भारावून टाकणारा असतो. जो तो माऊलीच्या गजरात दंग झालेला असतो. अनवाणी पायाने वारीत निघालेला वारकरी ऊन, पाऊस कशाचीही पर्वा न करता जीवाची तमा न बाळगता विठुरायाच्या ओढीने फक्त चालत असतो. वारी म्हणजे आनंद सोहळा आणि या आनंद सोहळ्याचा भाग होणे प्रत्येकाच्या नशिबी नसतं. (Pandharichi Wari 2024) सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या उर्जेला सलाम केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग व्हिडिओंपैकी एक ठरला आहे.