Paytm Payments Bank : Paytm पेमेंट्स बँकेला मोठा धक्का; मनी लॉंडरिंग प्रकरणी 5.49 कोटींचा दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Paytm Payments Bank) आधीपासून अडचणीत असलेल्या पेटीएम पेमेंट बँकेच्या अडचणी थांबायचं काही नाव घेईनात. रिझर्व्ह बँकेच्या सामोरे जात असताना आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पेटीएम बँकेला ५.४९ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला असून यानंतर पेटीएम पेमेंट्स बॅंकेच्या अडचणीत आणखीच वाढ झाल्याचे समजत आहे. दरम्यान, पेटीएम बँकेची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक केवळ या तारखेपर्यंत पेटीएम बँक वापरू शकतात. यानंतर त्यांना इतर पर्यायांचा अवलंब करावा लागेल.

अर्थ मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती

अर्थ मंत्रालयाद्वारे या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात सांगताना अर्थ मंत्रालयाने म्हटले की, ‘पेटीएम पेमेंट्स बँकेतील खाती ही बेकायदेशीर व्यवहार, क्रियाकल्पांमध्ये गुंतलेल्या संस्थांमार्फत वापरली जात होती. (Paytm Payments Bank) यानंतर ती इतर खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली’. याबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, ‘फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट ऑफ इंडिया (FIU- IND), मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत अधिकार यांचा वापर करून पेटीएम पेमेंट्स बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे.

निवेदनात काय लिहिलंय ?

निवेदनात लिहिलंय की, ‘फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट ऑफ इंडिया (FIU- IND) ला ऑनलाइन सट्टेबाजी आयोजित करण्यासह अनेक बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या संस्थांच्या नेटवर्कबद्दल कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या महत्वाची आणि मुख्य एजन्सींकडून माहिती मिळाली होती. (Paytm Payments Bank) ज्याच्या आधारावर पेटीएम पेमेंट्स बँकेचा आढावा घेण्यात आला. या बेकायदेशीर ऑपरेशन्समधून मिळालेला निधी अर्थात गुन्ह्यातून मिळालेला पैसा, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या खात्यांमधून व्यवहार केला गेला आहे. त्यामुळे FIU-IND ने मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर ५.४९ कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे’.

१५ मार्च अंतिम मुदत (Paytm Payments Bank)

यापूर्वी, फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट ऑफ इंडियाने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी दंड आकारण्याचा आदेश पारित केला होता. तर रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारीनंतर ग्राहकांच्या खात्यांमध्ये नवीन ठेवी किंवा क्रेडिट स्वीकारण्यास बंदी घातली होती. यानंतर ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकेने ग्राहकांसाठी ही मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली आहे.

यामुळे ग्राहकांना पेटीएम वॉलेटचा वापर केवळ १५ मार्चपर्यंत करता येईल. याबाबत बोलताना पेटीएमने म्हटले आहे की, ग्राहकांना व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. इतकेच नव्हे तर यासाठी इतर काही पर्यायांचा विचार करत आहेत. (Paytm Payments Bank)