PCOD Diet : PCOD दरम्यान ‘असा’ असावा आहार; वजन राहील नियंत्रणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PCOD Diet) कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष देताना स्त्रिया आपल्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसतात. प्रत्येक घरातील गृहिणी ही तिच्या पती, मुलं, सासू-सासरे आणि इतर मंडळींच्या प्रत्येक लहान गोष्टीबाबत कायम सतर्क असतात. मात्र जेव्हा गोष्ट त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची असते त्या मात्र लहान सहान दुखण्यांपासून मोठ्या आजारांपर्यंत सहज दुर्लक्ष करताना दिसतात. अशाप्रकारे मागचा पुढचा विचार न करता आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, ही सगळ्यात मोठी चूक आहे. जी जवळपास सगळ्याच महिला करतात.

चुकीच्या जीवन पद्धतीमुळे आधीच मानवी आरोग्यावर होणारे परिणाम अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येत आहे. अशातच गेल्या काही काळात तरुण मुलींमध्ये PCOD चे प्रमाण वाढताना दिसले आहे. PCOD ही मासिक पाळीशी संबंधित एक स्थिती आहे. ज्यामध्ये मासिक पाळी अनियमित होते. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक तरुणी PCOD सारख्या स्थितीने त्रासल्या आहेत.

(PCOD Diet) दरम्यान, हार्मोनल इम्बॅलन्स, अशक्तपणा, चिडचिड आणि वजन वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. हार्मोनल इम्बॅलन्स आणि अशक्तपणा तसेच बिघडलेली पिरियड सायकल यामुळे वाढणारे वजन थांबवणे अत्यंत कठीण वाटू लागते. म्हणूनच आज आपण PCOD दरम्यान वाढणारे वजन नियंत्रणात कसे आणता येईल? PCOD म्हणजे नक्की काय? आणि PCOD असल्यास काय आहार करावा? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

PCOD म्हणजे काय?

PCOD म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. हि महिलांमध्ये उद्भवणारी मासिक पाळीशी संबधित स्थिती आहे. या स्थितीत परिपक्व स्त्री- बीज निर्मिती होत नाही. तसेच गर्भधारणेत अडचण येते. (PCOD) आजकाल स्त्रियांमध्ये उद्भवणारी ही एक सामान्य समस्या आहे. जी चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढताना दिसते. ही स्थिती निर्माण होण्यामागे मुख्यतः हार्मोनल असंतुलन जबाबदार असते.

PCOD असेल तर ‘असा’ घ्या आहार (PCOD Diet)

गेल्या काही काळात PCOD च्या समस्येने त्रासलेल्या स्त्रियांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या स्थितीत स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढतो. अशावेळी प्रामुख्याने आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या स्थितीमध्ये महिलांनी भरपूर फायबर युक्त आहार करावा.

  1. तसेच नियमित सकाळी आवळा ज्यूस , कोरफड ज्यूस यांसारख्या उपयुक्त वनस्पतीच्या पाण्याचे सेवन करावे.
  2. PCOD ने त्रासलेल्या महिलांनी आपल्या आहारात कडधान्य, पालेभाज्या, फळभाज्या यांचा मोठा समावेश करावा. तसेच
  3. या भाज्या बनवताना तेलाचा वापर न करता गावठी तुपाचा वापर केल्यास अधिक फायदा होऊ शकतो.
  4. या परिस्थितीत प्रामुख्याने पालेभाज्या खाल्यास वजन नियंत्रित ठेवणे सोपे जाते. (PCOD Diet)
  5. याशिवाय दिवसभरात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.
  6. यासोबत विविध फळांचे ज्यूस आणि ताक देखील तुम्ही घेऊ शकता.
  7. बाजारात सीजननुसार येणारे फळे खाल्ल्याने देखील फायदा होतो.

PCOD ला दूर ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी महत्वाच्या

  1. उच्च कोलेस्टेरॉल, फैट, आणि कार्बोहाइड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन प्रामुख्याने टाळणे.
  2. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे.
  3. दारू, सिगरेट अशा गोष्टींपासून लांब राहणे.
  4. अधिक तेलकट, मसालेदार, आंबट पदार्थ खाणे टाळणे.
  5. महत्वाचे असे की, स्त्रियांनी आपल्या आहाराच्या वेळा चुकवता कामा नये.
  6. तसेच नियमित व्यायाम करावा. ज्यामुळे शारीरिक हालचाल होत राहील.
  7. मेडिटेशन अभ्यास सुद्धा करावा. यामुळे ताणतणाव दूर राहील आणि यामुळे देखील हार्मोन्स बॅलन्स करणे सोपे जाते. (PCOD Diet)