हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pension Schemes) सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच लोकांना आर्थिक भविष्याची चिंता सतावत राहते. त्यामुळे सेवा निवृत्त होऊनही त्यांच्या आयुष्यात शांतता राहत नाही. कारण ऑफिसला जाणे जरी थांबले असले तरी रोजचे आर्थिक व्यवहार संपणार नाहीत याची प्रत्येकाला माहिती असते. त्यामुळे रोजचा दिवस आणि रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा याचे टेन्शन राहते. असे टेन्शन नको असेल तर ही बातमी पूर्ण वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला काही सरकारी आणि खाजगी योजनांविषयी माहिती देणार आहोत. ज्यामध्ये गुंतवणुक केल्यास तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ मिळू शकतो. चला तर या योजनांविषयी माहिती घेऊया.
1. मुदत ठेव (FD)
विविध बँका तसेच पोस्ट ऑफिस वेगवेगळ्या आणि विशिष्ट कालावधीसाठी मुदत ठेव सुविधा प्रदान करतात. ही FD ची सुविधा मासिक, त्रैमासिक, वर्षातून दोनदा किंवा वार्षिक स्वरूपात असू शकते. (Pension Schemes) यात जमा केलेल्या रकमेवर आधारावर व्याज प्रदान केले जाते. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा ०.२५% जास्त व्याजदर दिले जाते.
2. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
पोस्टाच्या माध्यमातून अनेक गुंतवणूक योजना सादर केल्या जातात. त्यापैकी पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही वार्षिक ८.२०% व्याज दर देणारी योजना आहे. जी गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. (Pension Schemes) यामध्ये किमान गुंतवणुकीची रक्कम ही १ हजार रुपये असून यात जास्तीत जास्त ३० लाख रुपये जमा करता येतात. यामध्ये ही रक्कम एकाच वेळी जमा केली जाते. जी ५ वर्षांच्या कालावधीत मासिक उत्पन्न व्याजाच्या स्वरूपात मिळते. मुख्य बाब अशी की, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर १.५ लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जाते.
3. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS)
पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजनादेखील अत्यंत लाभदायी आहे. या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. या योजनेत जमा केलेली रक्कम तुम्हाला थेट ५ वर्षांनी मिळते. ही योजना दरवर्षी ७.४% व्याज देते. (Pension Schemes) यामध्ये एका व्यक्तीसाठी जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि जोडप्यासाठी १५ लाख रुपये गुंतवता येतात. ज्यातून एका व्यक्तीला जास्तीत जास्त ५,५५० रुपये तर जोडप्याला जास्तीत जास्त ९२५० रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.
4. म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन (SWP)
म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन हीदेखील मासिक उत्पन्न योजना आहे. (Pension Schemes) गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात एकत्र गुंतवणूक करून या फंडच्या माध्यमातून निश्चित स्वरूपातील मासिक पेन्शन मिळवू शकतो.
5. अटल पेन्शन योजना (Pension Schemes)
अटल पेन्शन योजना ही एक सरकारी योजना आहे. जी खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर अवलंबून असणाऱ्या ६० वर्षांच्या वयानंतर १ हजार ते ५ हजार रुपये मासिक पेन्शन उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ ते ४० वयवर्षे गटातील कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते.