टोल टॅक्सबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने टोल टॅक्सबाबत नवे नियम केले आहेत. आता ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम वापरणाऱ्या खासगी वाहन चालकांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. यासोबतच जर टोल रस्त्याचा वापर केल्यास 20 कि.मी. च्या आत केला तर त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. यासोबतच हे नियम संपूर्ण देशात लागू करण्यास सांगितले आहे.
परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर दररोज 20 किलोमीटरपर्यंत प्रवास करण्यासाठी खाजगी वाहनधारकांना कोणताही कर भरावा लागणार नाही. तथापि, ज्यांच्या वाहनांमध्ये GNSS प्रणाली कार्यरत आहे त्यांना ही सूट मिळेल. तर खासगी वाहनचालकांनी २० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले, तर प्रत्यक्ष अंतराच्या आधारेच टोल आकारला जाईल.
सरकारने GNSS लागू केले
काही दिवसांपूर्वी रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने फास्टॅगसह ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टमवर आधारित टोल प्रणाली लागू केली आहे. ही प्रणाली संपूर्ण देशात वापरली जात नसली तरी सध्या, एक सरकारी पथदर्शी प्रकल्प म्हणून, कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्ग 275 च्या बेंगळुरू-म्हैसूर विभागात आणि हरियाणातील राष्ट्रीय महामार्ग 709 च्या पानिपत-हिसार महामार्गावर लागू करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे सरकार देशातील इतर महामार्गांवरही ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम लागू करणार आहे.