Personal Loan : तुम्हालाही पर्सनल लोन घ्यायचंय? तत्पूर्वी पहा कोणत्या बँकेचा व्याजदर किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Personal Loan) अनेक लोक आपत्कालीन आर्थिक परिस्थितीत मित्र किंवा निकटवर्तीयांकडून पैशांची मदत घेण्याऐवजी बँकेकडून कर्ज घेणे पसंत करतात. कधीही कोणत्याही वेळी कशाही प्रकरि आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. काही वेळा घरात अचानक वैद्यकीय अडचण, लग्न समारंभ, परदेशवारी किंवा अन्य काही कारणांमुळे मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते. अशावेळी आपल्याकडे पैसे असतीलच असे नाही. त्यावेळी पर्सनल लोन घेणे फायदेशीर ठरते. मात्र पर्सनल लोन देणाऱ्या बँका वेगवेगळा व्याजदर आकारू शकतात. ज्याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.

(Personal Loan) कोणती बँक किती व्याजदर आकारते हे पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी माहित असणे गरजेचे आहे. कारण व्याजदराचा प्रभाव हा आपल्या मासिक EMI वर होत असतो. म्हणून आज आपण पर्सनल लोनवर कोणती बँक किती व्याजदर आकारते आणि त्यामुले तुम्हाला किती ईएमआय भरायला लागेल? याविषयी माहिती घेणार आहोत.

आयसीआयसीआय बँक (ICICI)

आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI) माध्यमातून जर आपण पर्सनल लोन घेणायचा विचार करत असाल तर ही बँक किती व्याजदर आकारते याविषयी आधीपासून माहिती असणे गरजेचे आहे. आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ. समजा, आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही ५ वर्षाच्या कालावधीसाठी १ लाख रुपयांचे कर्ज घेतले तर या रकमेवर बँक १०.७५ टक्के ते १९ टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारते.

(Personal Loan) म्हणजेच या रकमेसाठी तुम्हाला प्रतिमहिना २१६२ ते २५९४ पर्यंतचा EMI भरणे गरजेचे राहील. मुख्य म्हणजे, या बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतेव्वेळी २.५ टक्क्यांपर्यंत प्रोसेसिंग फी आकारली जाते हे लक्षात घ्या.

युनियन बँक ऑफ इंडिया

जर तुम्ही युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पर्सनल लोन घेतले तर तुम्हाला किती वर्षाचा कालावधी आणि किती व्याजदर आकारला जाईल याबाबत माहिती देताना वरीलप्रमाणे उदाहरण घेऊ. (Personal Loan) त्यानुसार, जर तुम्ही ५ वर्षाच्या कालावधीसाठी १ लाख रुपये कर्ज घेतले तर त्यावर ९.३ टक्के ते १३.४ टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारला जाईल. म्हणजेच या रकमेसाठी तुम्हाला प्रतिमहिना २०९० पासून ते २२९६ रुपये पर्यंतचा EMI भरणे बंधनकारक राहील. इतकेच नव्हे तर, या बँकेच्या माध्यमातून कर्ज देतेवेळी रकमेच्या ०.५ टक्के प्रोसेसिंग फी घेतली जाते.

बँक ऑफ इंडिया

तसेच देशातील नामवंत बँकांपैकी एक बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून तुम्ही ५ वर्षांसाठी १ लाख रुपयांचे पर्सनल लोन घेऊ शकता. यावर तुम्हाला १०.३५ टक्के ते १४.८५ टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारला जाईल. म्हणजेच या रकमेसाठी तुम्हाला २१४२ ते २३७१ रुपये इतका EMI भरावा लागेल. मुख्य म्हणजे, या बँकेच्या माध्यमातून कर्जाच्या रकमेवर २ टक्के प्रोसेसिंग फी आकारली जाईल. (Personal Loan)

एचडीएफसी बँक (HDFC)

वरील उदाहरणाप्रमाणे, जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून ५ वर्षाच्या कालावधीसाठी १ लाख रुपयांचे कर्ज घेतले. तर बँक यावर तुम्हाला १०.३५ टक्के ते २१ टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारेल. म्हणजेच या रकमेसाठी तुम्हाला प्रतिमहिना २१४२ ते २७०५ पर्यंतचा EMI भरावा लागेल.

ॲक्सिस बँक (Personal Loan)

ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून तुम्ही ५ वर्षाच्या कालावधीसाठी १ लाख रुपयांचे लोन घेतल्यास त्यावर १०.४९ टक्के ते १३.६५% पर्यंत व्याजदर आकारला जातो. यासाठी तुम्हाला २१४९ ते २३०९ रुपये इतका EMI भरावा लागेल.