Personal Loan : पर्सनल लोन घेताय? थांबा!! आधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या; नाहीतर, कर्जाच्या जाळयात अडकाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Personal Loan) गेल्या काही काळात बरीच लोक वैयक्तिक कर्ज घेत असल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे, आजकाल बऱ्याच बँका अगदी कमी कागदपत्रांसह कमी वेळात सोयीस्कर स्वरूपात पर्सनल लोन देतात. त्यामुळे लोकांसाठी पर्सनल लोन घेणे सोपे झाले आहे. खरतर पर्सनल लोन एक असुरक्षित कर्ज मानलं जात. मात्र तरीही काही कारणांसाठी पर्सनल लोन घेणे सोयीचे समजले जाते. नजीकच्या काळात जर तुम्हीही पर्सनल लोन घेण्याच्या विचारात असाल तर मग ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. कर्ण आज आम्ही तुम्हाला पर्सनल लोन घेतेवेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? याविषयी माहिती देणार आहोत.

बँकांच्या दृष्टीने पर्सनल लोन हे सर्वसाधारणपणे खूप महाग आणि असुरक्षित कर्ज मानले जाते. त्यामुळे बँका पर्सन लोन (Personal Loan) उच्च जोखमीचे कर्ज आहे असे गृहीत धरतात आणि त्याचा व्याजदर हा उच्च ठेवतात. असे असले तरीही आपण स्वस्त पर्सन लोन घेऊ शकतो. फक्त यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्या कोणत्या? याविषयी आपण माहिती घेऊ.

चांगला क्रेडिट स्कोअर हवा

पर्सनल लोन स्वस्त दरात हवे असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असायला हवा. (Personal Loan) कारण, तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्ही तुमची मागील कर्जे कोणत्याही डिफॉल्टशिवाय वेळेवर फेडली आहेत याचा पुरावा असतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० च्या वर असेल तर त्याला चांगला क्रेडिट स्कोअर म्हणता येईल. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल याची काळजी घ्या.

इतर शुल्क लक्षात घ्या (Personal Loan)

कमी दरात पर्सनल लोन हवे असेल तर आधी तुम्ही घेत असलेल्या कर्जासोबत असणारे इतर शुल्क तपासा. हे इतर शुल्क तुमचे लोन महाग करतात. ज्यामध्ये प्रीपेमेंट शुल्क आणि उशीरा पेमेंट यांशिवाय काही अतिरिक्त खर्चदेखील आहेत. ज्यांच्या एकत्रित येण्याने तुमचे कर्ज महाग होऊ शकते. त्यामुळे पर्सनल लोन घेताना आधी इतर शुल्क तपासणी करा.

इतर बँकांशी तुलना करा

तुम्ही घेत असलेले कर्ज पर्सनल असो किंवा इतर कोणतेही ते घेण्याआधी वेगवगेळ्या बँकांची तुलना करा. कारण, बऱ्याचदा वेगवेगळ्या बँका वेगवेगळे दर आकारत असतात. (Personal Loan) शिवाय व्याज आकार, प्रक्रिया शुल्क, कर्जाची रक्कम यासह सर्व बँकाच्या अटी आणि शर्तीसुद्धा भिन्न असू शकतात. त्यामुळे पर्सनल लोन घेण्याआधी वेगवेगळ्या बँकांची तुलना करा म्हणजे बराच पैसा वाचवता येईल.

परतफेडीसाठी सक्षमता महत्वाची

कोणतेही कर्ज घेताना आपण एक जबाबदारी खांद्यावर घेत आहोत हे लक्षात घ्या. त्यामुळे पर्सन लोन घेताना तुम्ही त्या कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहात याची पक्की खात्री करून घ्या. (Personal Loan) महत्वाचे म्हणजे, तुमच्या मासिक उत्पन्नानुसार आणि जितकी गरज आहे तितकेच कर्ज घ्या. म्हणजे कर्जाच्या जाळ्यात अडकून नंतर पश्चाताप होणार नाही.