Pizza Corn: पावसाळ्याचे दिवस म्हंटले की मस्त थंडगार पावसाळी वातावरण आणि आशा पावसात भाजलेले मक्याचे कणीस … आहाहा ! अफलातून कॉम्बिनेशन पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही गाड्यावर किंवा घरी बनवलेले कणीस आवर्जून खात असाल मात्र नेहमीप्रमाणे भाजलेले किंवा उकडलेले कणीस न खाता तुमच्या मान्सून कॉर्न ला थोडा हटके ट्विस्ट देऊया.. तुम्ही कॉर्न पिझ्झा नेहमीच खात असाल मात्र पिझ्झा कॉर्न कधी ट्राय केलाय का ? चला तर मग यंदाच्या पावसाळ्यात ही हटके रेसिपी नक्की ट्राय करा. पाहुयात ही रेसिपी Pizza Corn कशी बनवायची
साहित्य Pizza Corn
दोन कॉर्न ,वन फोर्थ कप कॉर्न फ्लेक्स, दोन टेबलस्पून पिझ्झा सॉस, एक टेबलस्पून मेयोनीज ,अर्धा टीस्पून काळे मीठ, अर्धा टीस्पून काळीमिरी, अर्धा टीस्पून लाल तिखट, एक टीस्पून चीली फ्लेक्स, एक टीस्पून ओवा, एक टीस्पून चाट मसाला व दोन टेबलस्पून कोथिंबीर एक टेबलस्पून लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ.
कृती Pizza Corn
क्रंची पिझ्झा कॉर्न (Pizza Corn) बनवण्यासाठी सर्वप्रथम कोर्न सोलून घ्या. मीठ मिसळलेल्या पाण्यात ते झाकून दहा मिनिटे उकाडाण्यासाठी ठेवा. दुसऱ्या एका बाऊलमध्ये पिझ्झा सॉस मेयॉनीज , मीठ, काळे मीठ, काळीमिरी, लाल तिखट, चिली फ्लेक्स, ओवा, चाट मसाला ,कोथिंबीर, लिंबाचा रस आणि बटर घालून सर्व नीट मिक्स करून घ्या. मॅरिनेशन तयार करा. त्यानंतर मक्याच्या क्रंची टेस्ट साठी मिक्सरमध्ये कॉर्नफ्लेक्स थोडे जाडसर बारीक वाटून घ्या आणि एका प्लेटमध्ये पसरवा यानंतर पाण्यातून उकडलेला मका काढून त्यावरचे अतिरिक्त पाणी कापडाने वाळवून घ्या. त्यानंतर त्यावर ब्रशच्या सहाय्याने मॅरीनेट केलेली पेस्ट लावा. यानंतर हा मका बारीक केलेला कॉर्नफ्लेक्स मध्ये कोट करून घ्या. यानंतर हा मका गॅसवर एक मिनिटासाठी भाजून घ्या. तुमचा चविष्ट क्रंची पिझ्झा कॉर्न तयार आहे.