प्रवाशांना स्थानकात सोडणे पडेल महागात ! भरावा लागेल दंड ; वाचा काय आहे नवीन नियम?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आता एक महत्वाची बातमी आहे. आगामी दिवाळी सणानिमित्त रेल्वेला लोकांची मोठी गर्दी आहे. त्यातच प्रवाशांना सोडण्यासाठी तुम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. सणासुदीच्या काळात होणारी गर्दी पाहता रेल्वेने फलाटांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. वृद्ध आणि अपंग महिलांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट जारी केले जाईल, ज्याचा कालावधी फक्त दोन तासांचा असेल. ६ नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी असेल. तुम्ही विना तिकीट पकडले गेल्यास रेल्वे दंड आकारेल.

प्लॅटफॉर्म तिकीट नाही मिळणार

सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळी काळात फलाटावर प्रवाशांची व त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढते. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

पकडल्यास किती दंड होईल?

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्लॅटफॉर्म तिकीट नसताना पकडले गेल्यास एकूण 250 रुपये दंड आणि 10 रुपये प्लॅटफॉर्म तिकीट शुल्कासह 260 रुपये आकारले जातील. रेल्वे स्थानकाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर टीटी तपासणी केली जाणार आहे. 28 ऑक्टोबरपासून रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढण्यास सुरुवात होईल, असा आरपीएफचा दावा आहे. दिवाळीसाठी विशेष ट्रेन चालवण्याचीही तयारी सुरू आहे. तूर्तास हा नियम जरी गाझियाबाद रेल्वे स्टेशन साठी लागू असला तरी इतर स्थानकांनवर सुद्धा हा निर्णय लागू केला जाऊ शकतो.