हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PM Awas Yojana) आपल्या हक्काचं पक्कं घर असावं म्हणून जो तो धडपडत असतो. देशातील नागरिकांची हीच धडपड पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे. या योजनेंर्तगत देशातील नागरिकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर आणि लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.
अलीकडेच नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली NDA चे सरकार स्थापन झाले. पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोदींनी देशभरात PM आवास योजनेच्या माध्यमातून ३ कोटी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. (PM Awas Yojana) त्यामुळे आता येणाऱ्या काही वर्षात नव्याने बांधल्या जाणाऱ्या या घरांसाठी तुम्ही पीएम योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी अर्ज कसा करायचा? याविषयी आपण जाणून घेऊ.
केंद्र सरकार बांधणार ३ कोटी घरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाला मंत्रिमंडळाचे सहमत मिळाल्यानंतर आता ३ कोटी घरे बांधण्यात येणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. (PM Awas Yojana) ही घरे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत बांधली जाणार असून यामध्ये कनेक्टेड शौचालय, वीज, एलपीजी गॅस कनेक्शन आणि पाण्याचे नळ जोडणी अशा आवश्यक सुविधादेखील दिल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करावा लागेल. याची नेमकी प्रक्रिया आणि स्वरूप काय? ते जाणून घेऊ.
काय आहे पंतप्रधान आवास योजना? (PM Awas Yojana)
केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना ही लोकांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी कमाल २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करते. देशातील कित्येक गरिब कुटुंबांचे स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून जो निधी मिळतो त्याचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाच्या आधारावर गटविभागणी करण्यात आली आहे. या गटांनुसार घरासाठी कर्ज दिले जाते.
पूर्वी या योजनेतून दिल्या जाणाऱ्या कर्जाची रक्कम ३ ते ६ लाख रुपये इतकी होती. या कर्जावर अनुदानदेखील दिले जात होते. मात्र, आता या योजनेतुन मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा १८ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. या योजनेसाठी अर्ज करायची प्रक्रिया नेमकी काय आणि कशी आहे? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
पंतप्रधान आवास योजनेसाठी ‘असा’ करा अर्ज
- पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी https://pmaymis.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- त्यांनतर मुख्य मेनूतून सिटीजन असेसमेंट पर्याय निवडा.
- यानंतर अर्जदार पर्यायाला सिलेक्ट करा. (PM Awas Yojana)
- आता या ठिकाणी एक नवी विंडो ओपन होईल. यामध्ये तुमचा आधार नंबर टाका.
- त्यापुढे वैयक्तिक माहिती भरावी आणि बँक खात्यासंदर्भातील संपूर्ण माहिती तसेच सध्याच्या घराचा पत्ता अशी आवश्यक माहिती भरा.
- यानंतर कॅपचा कोड टाका आणि माहिती व्हेरिफाय करून अर्ज सबमिट करा.
‘ही’ कागदपत्रे जमा करा
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. (PM Awas Yojana) याशिवाय उत्पन्नाचे प्रमाणपत्र, फॉर्म क्रमांक 16, बँक खात्याचे स्टेटमेंट आणि आयटी रिटर्न्सदेखील महत्वाचे आहेत.