देशातील वृद्ध व्यक्तींना PM मोदींकडून दिवाळी गिफ्ट ! मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत इलाज

ayushman bharat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयुष्मान योजनेच्या आयुष्मान भारत “निरामयम (ज्याला आजार होत नाही)” या नवीन टप्प्याचा शुभारंभ केला. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सुमारे 12,850 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला.आता आयुष्मान भारत या प्रमुख आरोग्य विमा योजनेंतर्गत ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व वृद्धांना मोफत उपचार घेता येणार आहेत.

दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध होतील. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय वर्ष असलेल्या वयस्क लोकांसाठी हेल्थ कव्हरेज मिळणार आहे. ही सुविधा कोणत्याही वृद्ध व्यक्तींसाठी प्राप्त होईल प्रत्येक वर्षी पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत इलाज याद्वारे करता येणार आहे. याशिवाय जे परिवारातले इतर सदस्य आहेत त्यांना देखील आयुष्मान योजनेचा फायदा होऊ शकतो. याच परिवारातील 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध व्यक्तींना दरवर्षी वेगळा 5 लाख रुपये पर्यंतचा मोफत इलाज दिला जाणार आहे. या योजनेमुळे देशातील जवळपास 4.5 करोड परिवार आणि त्यामधील सहा करोड पेक्षा जास्त वृद्ध व्यक्तींना लाभ मिळणार आहे आतापर्यंत या योजनेमध्ये कमी वय असलेल्या परिवारांना लाभ देण्यात येत होता. मात्र आता जास्त वय असलेल्या वृद्ध व्यक्तींना देखील या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ घेता येणार आहे

या योजनेअंतर्गत 70 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना आयुष्यमान कार्ड वाटप केले जाणार आहे. जे फॅमिली आयुष्मान प्लॅन पेक्षा वेगळे असेल स्पेशल असेल. हे स्पेशल कार्ड 29 ऑक्टोबर पासून मिळायला सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमात दरम्यान वृद्ध व्यक्तींना हे कार्ड सोपवले.

हे आयुष्मान कार्ड बीआयएस पोर्टल https://bis.pmjay.gov.in/ आयुष्मान ॲपद्वारे बनवले जातील, यासाठी वृद्धांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे लागेल आणि केवायसी देखील करावे लागेल.