पंतप्रधान मोदीचं Sunita Williams ला खास पत्र; भारत भेटीचं दिलं आमंत्रण !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय वंशाच्या प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्बल 9 महिन्यांपासून अंतराळात अडकले होते. नासाने या दोन अंतराळवीरांना परत आणण्याची योजना आखली अन आता यशस्वी अंतराळ मोहिम संपून त्या पृथ्वीवर परतत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक विशेष पत्र लिहून सुनीता विल्यम्सच्या यशाबद्दल कौतुक अन अभिमान व्यक्त केला आहे . पत्रात मोदींनी सांगितले की, सुनीता यांचा देशावर अपार प्रेम आहे आणि ती जरी अंतराळात असली तरी भारतीयांच्या हृदयात कायम आहे. संपूर्ण देश त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करत आहे. तसेच मोदींनी सुनीता विल्यम्स यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे.

विल्यम्स यांना भारत भेटीचे आमंत्रण –

मोदींनी आपल्या पत्रात उल्लेख केला की, “तुमच्यामुळे 140 कोटी भारतीयांना अभिमान वाटतो.” त्यांना हेही मान्य केले की सुनीता विल्यम्स यांच्या योगदानामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात भारतीयांचे स्थान मजबूत झाले आहे. तसेच, अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि सुनीता यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली . भारत आपल्या यशस्वी मुलींवर अपार गर्व करत आहे. मोदींनी सुनीता विल्यम्स यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आणि म्हटले की, “तुमची मायभूमी तुमचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे.” असे मोदी पत्रात म्हणाले आहेत.

योगदानाची जगभरात चर्चा –

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्याबद्दल भारतीय संस्कृतीवरील प्रेम आणि विज्ञानातील योगदान भारतीय जनतेला प्रेरित करणारे ठरले आहे. मोदींनी त्यांच्या सहकारी अंतराळवीर बेरी विलमोर यांना देखील शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत झालेल्या यशस्वी मोहिमेचे कौतुक केले. सुनीता विल्यम्स यांच्या अनुभवांची अन योगदानाची जगभरात चर्चा होणार आहे, आणि त्यांचा हा प्रवास संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण बनला आहे.