PNB Bank : PNB च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 जुलैआधी ‘हे’ काम न केल्यास तुमचे खाते बंद होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (PNB Bank) जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) करोडो ग्राहकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. वृत्तानुसार, पंजाब नॅशनल बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांकडे केवळ ४ दिवसाचा अवधी शिल्लक आहे. या चार दिवसांत ग्राहकांना आपले डॉर्मंट खाते सक्रिय ठेवायचे असेल तर येत्या ३० जूनपर्यंत एक महत्वाचे काम पूर्ण करावे लागेल. तसे न केल्यास ग्राहकांचे खाते बँकेकडून बंद करण्यात येईल. या संदर्भात सविस्तर माहिती देणारी नोटीस बँकेकडून आधीच ग्राहकांना पाठवली गेली आहे. हा नेमका काय प्रकार आहे, त्याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

PNB मधील कोणती खाती बंद होणार? (PNB Bank)

जर तुम्ही पीएनबी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी चुकूनही स्किप करू नका. जर तुमचे पीएनबी बँकेत बचत खाते असेल तर सगळ्यात आधी आपल्या खात्याची स्थिती तपासून या. कारण येत्या ३० जून २०२४ पर्यंत बँकेकडून काही खाती बंद करण्यात येणार आहेत. याबाबत बँकेने दिलेल्या अधिसूचनेत सांगितले आहे की, ज्या खात्यांमध्ये गेल्या ३ वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही, ज्यांच्या खात्यात गेल्या ३ वर्षांत केवळ ० रुपये शिल्लक आहे अशी खाती बँकेकडून लवकरच बंद केली जाणार आहेत.

अशा खातेधारकांना बँकेने आधीच नोटीस पाठवली आहे. (PNB Bank) या नोटीसचा कालावधी १ महिना असून महिनाभरात खातेधारकांना खाते सुरु न केल्यास बरोबर १ महिन्याने त्यांची खाती बंद केली जातील. त्यामुळे जर तुमचे तुमच्या खात्याकडे दुर्लक्ष झाले असेल तर आताच वेळ आहे आपल्या खात्याची स्थिती तपासा. आपले खाते सक्रिय ठेवण्यासाठी आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन लगेच केवायसी करून घ्या. अन्यथा, तुमचे बँक खाते १ जुलै २०२४ रोजी बँकेकडून पूर्णपणे बंद केले जाईल.

फक्त ४ दिवस बाकी

पीएनबी बँकेकडून आपल्या ग्राहकांना आधीच सूचित करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या खात्याचे KYC करून घ्यावे. तरीही बऱ्याच लोकांनी अद्याप केवायसी अपडेट न केल्यामुळे बँकेने ३० जून २०२४ पर्यंत मुदत वाढवली. मात्र, आता या कामासाठी कालावधी वाढवून दिला जाणार नसून १ जुलै २०२४ रोजी अशी सर्व खाती बंद करण्याचा मोठा निर्णय बँकेने घेतला आहे. (PNB Bank) बऱ्याच कालावधीपासून बंद असलेल्या खात्यांचा स्कॅमर गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, ग्राहकांना बँकेने यापूर्वीच नोटिसा पाठवून पूर्वसूचना दिल्या होत्या. यानंतर अखेर बँकेने ही खाती बंद करण्याचे निश्चित केले आहे.