POCO M6 5G : देशातील सर्वात स्वस्त 5G Smartphone लॉन्च ; सोबत 50GB डेटाही फ्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

POCO M6 5G : संपूर्ण जग एका छोट्याशा मोबाईलमध्ये सामावलेलं आहे. प्रत्येकाकडे आपला एक भारी मोबाईल असावा असे सर्वाना वाटत असते. मात्र सर्वानाच महागडा मोबाईल घेणे शक्य नसते. म्हणूनच Poco कम्पनीने मागील वर्षी Poco M6 5G हा स्वस्तात मस्त फोन लॉन्च केला. आता या कंपनीने हा फोन रिलॉन्च केला आहे. एवढेच नाही तर तर यावेळी हा फोन एकटयाने लॉन्च झाला नाही तर एअरटेलच्या भागीदारीमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. युमुळे साहजिकच या फोन सोबत तुम्हाला डेटा सुद्धा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या फोनची वैशिष्ट्ये आणि त्याच्या भागीदारीबद्दल …

काय आहे किंमत

POCO M6 5Gची किंमत आता 8,799 रुपये आहे. या अंतर्गत हा भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन असल्याचा दावा केला जात आहे. फोनची किंमत कमी असल्याने याचं कॅरियर-लॉक होऊ शकतं. म्हणजेच फोनवर एअरटेल व्यतिरिक्त इतर सिम कार्डला सपोर्ट मिळत नाही.

एअरटेलच्या भागीदारीचा फायदा (POCO M6 5G )

या फोनच्या खरेदी सोबत एअरटेल ग्राहकांना 50GB चा वन-टाइम डेटा बोनस देईल. ज्यांच्याजवळ पहिलेच एअरटेल सिम कार्ड आहे. ते तत्काळ या फोनचा वापर सुरु करुन ऑफर अ‍ॅक्टिव्ह करु शकता.

काय आहेत फोनची वैशिष्ट्ये ?

  • Poco M6 5G मध्ये 8GB LPDDR4X रॅम, Mali-G57 MC2 GPU आणि 256GB UFS 2.2 स्टोरेजसह ediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • पोकोचा हा फोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड MIUI 14 वर काम करतो.
  • 6.74 इंचांचा HD+ डिस्प्ले देण्यात आलाय. जो 1,600 x 720 पिक्सलसह येतो.
  • यामध्ये 600 nits च्या पीक ब्राइटनेस आणि 180Hz टच सँपलिंग रेट मिळतो
  • या फोनच्या डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनही मिळते
  • रॅम 8GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.
  • या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकेंडरी सेन्सर उपलब्ध आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेराही उपलब्ध आहे.
  • Poco M6 5G ची बॅटरी 5,000mAh ची आहे
  • (POCO M6 5G ) या फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅकही देण्यात आलाय.