POCO M7 5G: POCO M7 5G स्मार्टफोन लाँच; 5160mAh बॅटरी अन 50MP कॅमेरा

0
18
POCO M7 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । POCO M7 5G – शाओमीच्या सब-ब्रँड POCO ने भारतात POCO M7 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन मागील वर्षी लाँच केलेल्या POCO M7 Pro स्मार्टफोनचा परवडण्याजोगा पर्याय आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट, 5G नेटवर्क सपोर्ट आणि 2 वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स दिले गेले आहेत. तर या POCO M7 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि दमदार फीचर्स बदल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

POCO M7 5G चे फीचर्स –

POCO M7 5G स्मार्टफोनमध्ये 6.88-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 1,640 x 720 पिक्सल रिझोल्यूशन आणि 600nits ब्राइटनेस आहे. या डिस्प्लेचे TUV Rheinland सर्टिफिकेशनही आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह Adreno GPU देतो. तसेच हा फोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB स्टोरेज ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये microSD कार्ड सपोर्ट देखील आहे. यामध्ये 8GB पर्यंत वर्च्युअल RAM सपोर्ट देखील मिळतो.सॉफ्टवेअर बदल सांगायचं झालं तर हा फोन Android 14 वर आधारित HyperOS कस्टम स्किनवर चालतो. पोकोचा दावा आहे की, या फोनला 2 वर्षांचा Android अपडेट आणि 4 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स मिळतील.

कॅमेरा आणि बॅटरी –

POCO M7 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX852 प्राइमरी कॅमेरा आहे. याच्या सोबत 2MP सेकेंडरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच 5,160mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग आहे. मात्र, फोनच्या बॉक्समध्ये 33W अ‍ॅडेप्टर दिला जातो. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type-C पोर्ट आहे. यासोबतच, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील दिला आहे.

POCO M7 5G ची किंमत –

POCO M7 5G स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत फक्त फर्स्ट सेलसाठी उपलब्ध असेल. हा फोन Satin Black, Mint Green, आणि Ocean Blue अशा 3 रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच या फोनचा पहिला सेल 7 मार्च पासून फ्लिपकार्टवर सुरू होईल. POCO M7 5G स्मार्टफोन युवांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकतो, ज्यात उच्च कार्यक्षमता आणि आकर्षक फीचर्स आहेत.