Poco X7 5G : 50MP कॅमेरा, 5,500mAh बॅटरी; Poco X7 5G मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ

Poco X7 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Poco X7 5G- Poco ने आपली नवीन Poco X7 5G सीरीज भारतात लाँच केली आहे. या लाइनअपमध्ये Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G हे दोन स्मार्टफोन्स समाविष्ट आहेत. तसेच या Poco X7 5G चा सेल 17 फेब्रुवारीपासून Flipkart वर सुरू होईल, तर Poco X7 Pro 5G चा सेल 14 फेब्रुवारीपासून Flipkart वर सुरू होणार आहे. त्याचसोबत ICICI बँक ग्राहकांसाठी 2,000 रुपयाचा डिस्काउंट ऑफर उपलब्ध असेल, ज्यामुळे ग्राहकांची बचत होईल. त्याचप्रमाणे, Poco X7 Pro 5G च्या पहिल्या सेलच्या दिवशी खरेदीदारांना 1,000 रुपयाचा अतिरिक्त डिस्काउंट कूपन मिळेल. त्यामुळे ग्राहकांना चांगला फोन उपलब्ध होणार आहे. तर चला या Poco X7 5G सीरीजची पूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Poco X7 5G सीरीजची वैशिष्ट्ये –

Poco X7 5G मध्ये 6.67 इंचाचा 1.5K कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 3,000nits पर्यंत पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शनसह येतो. दुसरीकडे, Poco X7 Pro 5G मध्ये 6.73 इंचाचा 1.5K फ्लॅट AMOLED डिस्प्ले आहे, जो 3,200nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शनसह येतो. प्रो वेरिएंटच्या स्क्रीनमध्ये बेस मॉडेलसारखा रिफ्रेश रेट आणि टच सॅम्पलिंग रेट आहे. तसेच Poco X7 5G मध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसर आहे, तर Poco X7 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 8400 Ultra प्रोसेसर आहे. बेस वेरिएंटमध्ये LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज आहे आणि Android 14-बेस्ड HyperOS वापरण्यात आले आहे. Poco X7 Pro 5G Android 15-बेस्ड HyperOS 2.0 वर चालतो आणि त्यात LPDDR5X रॅम आणि UFS 4.0 स्टोरेजसाठी सपोर्ट आहे. दोन्ही फोनला तीन वर्षांची OS अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे.

विविध परफॉर्मन्स-बूस्टिंग टूल्स –

फोटोग्राफीसाठी Poco X7 5G मध्ये f/1.59 अपर्चर आणि OIS व EIS सह 50-मेगापिक्सलचा अननोन प्राइमरी रियर सेंसर आहे, तर प्रो वेरिएंटमध्ये 50-मेगापिक्सलचा Sony LYT-600 प्राइमरी सेंसर आहे. दोन्ही फोन्समध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड शूटर आणि 20-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग कॅमेरा आहे. या फोन्समध्ये AI-सपोर्टेड इमेजिंग, फोटो एडिटिंग आणि Poco AI नोट्स सारखे विविध परफॉर्मन्स-बूस्टिंग टूल्स आहेत. Poco X7 Pro 5G मध्ये 90W हायपरचार्ज सपोर्टसह 6,550mAh बॅटरी आहे, ज्यामुळे फोन 47 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होतो. दुसरीकडे, Poco X7 5G मध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,500mAh बॅटरी आहे.

कनेक्टिविटी ऑप्शन्स –

दोन्ही फोनमध्ये कनेक्टिविटी ऑप्शन्स म्हणून 5G, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.3 आणि USB टाइप-C पोर्ट आहे. या दोन्ही Poco X7 5G सीरीज फोनला डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्ससाठी IP66+IP68+IP69 रेटिंग मिळण्याचा दावा केला आहे. ते TÜV रीनलँड लो ब्लू लाइट आणि फ्लिकर-फ्री सर्टिफाइड आहेत आणि डॉल्बी अॅटमॉससह ड्यूल स्टीरियो स्पीकरसुद्धा देतात.

किंमत आणि रंग –

Poco X7 5G मध्ये 8GB + 128GB वेरिएंट 21,999 मध्ये आणि 8GB + 256GB वेरिएंट 23,999 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन सिल्वर, हिरव्या , आणि पिवळ्या या रंगांमध्ये खरेदी करता येईल.तर, Poco X7 Pro 5G मध्ये 8GB + 256GB वेरिएंट 26,999 मध्ये आणि 12GB + 256GB वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन हिरव्या , काळ्या आणि पिवळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

हे पण वाचा: पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल ; प्रवाशांची होणार सोय, जोडल्या जाणार आणखी सहा ट्रिप