POMIS Scheme : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; एका गुंतवणुकीवर दरमहा कमावण्याची संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (POMIS Scheme) आजकाल जो तो गुंवणूकीसाठी विविध पर्याय शोधत आहे. कारण प्रत्येकाला भविष्याची सुरक्षा हवी आहे आणि यासाठी गुंतवणूक फायदेशीर ठरते. एखाद्या खात्रीशीर आणि जोखीममुक्त योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणारा परतावा हा आपल्या भविष्यातील आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठीचा फायदेशीर ठरतो. त्यामुळे अनेक लोक विविध योजनांमध्ये आवर्जून गुंतवणूक करत आहेत. तर काही लोक अजूनही गुंतवणूक कुठे करावी याबाबत विचार करत आहेत.

जर तुम्हीही कमी जोखीम, विश्वासार्ह आणि खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनेच्या शोधात आहात, तर सरकारी योजना हा उत्तम पर्याय आहे. कारण गेल्या काही काळात सरकारमार्फत सुरु केलेल्या गुंतवणुकीच्या योजनांना गुंतवणूकदारांकडून मोठी पसंती मिळाली आहे. (POMIS Scheme) आजही अनेक लोक विश्वासाचा प्रश्न असेल तर सर्वात आधी सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात. त्यातही पोस्टाच्या योजनांचा विशेष पसंती दिली जातेय. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सरकार अंतर्गत येणाऱ्या विना जोखीम गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या एका योजनेची माहिती देणार आहोत.

पोस्ट ऑफिसची POMIS योजना (POMIS Scheme) तुम्ही ऐकून असाल. ही योजना केवळ विश्वासार्ह नव्हे तर गुंतवणूक केल्यास खात्रीशीर नफा देणारी योजना आहे. पोस्ट ऑफिसकडून छोट्या गुंतवणूकदारांसाठी अनेक स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम सादर केल्या जातात. ज्यामध्ये एकदाच गुंतवणूक करून दरमहा चांगले व्याज मिळवता येते. यांपैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना अर्थात POMIS योजना होय. चला तर POMIS योजनेविषयी अधिक माहिती घेऊया.

काय आहे POMIS योजना? (POMIS Scheme)

भारत सरकारद्वारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सादर केलेली मंथली इन्कम स्कीम म्हणजेच POMIS ही एक स्मॉल सेव्हिंग योजना आहे. जी गुंतवणूकदारांना प्रति महिना ठराविक रक्कम देते. यावर मिळणारे व्याजदर महिन्याला गुंतवणूकदारांना दिले जाते. POMIS योजनेंतर्गत एकदाच गुंतवणूक करावी लागते. एकदा खाते उघडल्यापासून पुढील ५ वर्षासाठी या योजनेची कालावधी लागू होते. बरोबर ५ वर्षांनी या योजनेची मॅच्युरिटी असते. या योजनेवर १ ऑक्टोबर २०२३ पासून ७.४ टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे.

POMIS अंतर्गत मासिक उत्पन्न कसे ठरवले जाते?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूकदार एकल खात्यात ९ लाख रुपये जमा करू शकता. तर संयुक्त खात्यात १५ लाख रुपये जमा करू शकता. या योजनेंतर्गत ५ वर्षाचा मॅच्युरिटी कालावधी आहे. (POMIS Scheme) दरम्यान मूळ रक्कम ही योजनेच्या परिपक्वतेनंतर परत केली जाते. तसेच यामध्ये योजनेचा कालावधी वाढवाता येतो. यापुढे ५ वर्षांचा कालावधी वाढवून घेता येतो. या योजनेत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर दरमहा व्याज खात्यावर जमा केला जातो.

दरमहा किती व्याज मिळते?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ५ लाख रुपये जमा केल्यास वार्षिक ७.४% व्याज दरमहा मिळेल. (POMIS Scheme) म्हणजेच या गुंतवणुकीवर दरमहा ३०८३ रुपये व्याज म्हणून दिले जातील. अर्थात संपूर्ण वर्षभरात म्हणजे १२ महिन्यात एकूण ३६,९९६ रुपये व्याज मिळेल.

योजनेचा कालावधी

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा आहे. अर्थात या योजनेची मॅच्युरिटी ५ वर्षांनी पूर्ण होते. मात्र एकदा योजनेत गुंतवणूक केल्यानंतर १ वर्षाने पैसे काढता येतात. दरम्यान १ ते ३ वर्षादरम्यान पैसे काढल्यास ठेव रकमेपैकी २% रक्कम कापली जाते. तर ३ वर्ष मुदतीपूर्वी पैसे काढल्यास तुमच्या ठेवीपैकी १% रक्कम कापली जाते. (POMIS Scheme)