Pondicherry : भारतात फ्रान्सचा फील देणारे एकमेव ठिकाण; जिथल्या वास्तुकलेवर आहे फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pondicherry) अनेक लोकांना फिरायला खूप आवडते. अशा लोकांच्या बकेट लिस्टमध्ये फ्रान्सचा समावेश हा असतोच. इथला निसर्ग आणि विशेष करून आकर्षक घरे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. पण काही कारणास्तव जर तुम्ही फ्रान्सला जाऊ शकत नसाल, तर नाराज होऊ नका. अशावेळी तुम्ही भारतातील फ्रेंच कॉलोनीला भेट द्या. जी पाँडिचेरीमध्ये आहे. दक्षिण भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळ अशी या केंद्रशासित प्रदेशाची ओळख आहे. इथे गेलात तर तुम्हाला अगदी फ्रान्समध्ये आल्यासारखंच वाटेल.

लिटल फ्रान्स ऑफ इंडिया (Pondicherry)

आज पाँडिचेरी हे अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. असे असले तरी, सुमारे ३०० वर्षे हे ठिकाण फ्रेंच राजवटीत होते. ज्यामुळे येथील राहणीमान, खाद्य संस्कृती आणि वास्तुकलेवर फ्रेंच फ्रेंच संस्कृतीचा ठसा आजही कायम आहे. येथील वास्तुकलेचे नमुने अत्यंत आकर्षक आणि फ्रेंच संस्कृतीचे उदाहरण देतील असे आहेत. येथील लोकांची जीवनशैली आणि वास्तूची ठेवण फ्रेंच संस्कृतीप्रमाणे असल्याने बरेच लोक या कॉलोनीला ‘भारताची फ्रेंच कॉलनी’ किंवा दक्षिणेतील ‘पॅरिस’ म्हणून ओळखतात. इतकंच नव्हे तर अनेक भागात या कॉलोनीला ‘लिटल फ्रान्स ऑफ इंडिया’ असेही म्हणतात.

वास्तुकलेवर फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव

या फ्रेंच कॉलनीतील घरांचे सौंदर्य इतके गजब आहे की, ते पर्यटकांना आपोआप स्वतःकडे आकर्षित करते. (Pondicherry) त्याचप्रमाणे इथे असलेल्या जवळपास सर्व घरांची रचना फ्रेंच संस्कृतीला लक्षात ठेवून करण्यात आली आहे. या वसाहतींचे बांधकाम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले असून इथले प्रत्येक घर मोहरीच्या पिवळ्या रंगाने अर्थात मस्टर्ड येल्लो कलरने रंगवलेले आहे.

फ्रेंच कॉलनीजवळील सर्वोत्तम ठिकाणे

या फ्रेंच कॉलनीच्या आजूबाजूला भेट द्यावी अशी काही सुंदर ठिकाणे आहेत. जिथे आवर्जून जावे. यामध्ये अरविंदो आश्रम या शांतताप्रिय ठिकाणाचा समावेश आहे. (Pondicherry) तसेच प्रोमेनेड बीच हे येथील अत्यंत गजबजलेले आणि सूर्योदय- सूर्यास्ताच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठीचे सुंदर ठिकाण मानले जाते. तसेच येथील बोटॅनिकल गार्डनदेखील फिरण्यासाठी फार सुंदर आहे.

सिनेसृष्टीलाही भुरळ

पाँडिचेरीचे सौंदर्य पाहता येथे केवळ फिरण्यासाठी नव्हे तर अनेक सिनेमे तसेच सीरिजचे शूट करण्यासाठी देखील लोक येतात. तसेच फोटोग्राफीसाठी देखील हे ठिकाण फारच सुंदर आहे. या ठिकाणी आजपर्यंत अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. आजही अनेक दिग्दर्शक मंडळी चांगल्या लोकेशन्सबाबत चर्चा करताना पाँडिचेरीच्या नावाचा आवर्जून उल्लेख करतात. (Pondicherry)